Local Body Election News : इच्छुकांचे गुडघ्याला बाशिंग; पण नशिबाचा खोडा, महापालिका निवडणुका लोकसभेनंतरच...

Supreme Court : सर्वोच्च न्यायालयात 9 जानेवारीला होणारी सुनावणी आता 4 मार्चला होणार
Supreme Court
Supreme CourtSarkarnama
Published on
Updated on

Election : आज होणार, उद्या होणार असे म्हणत तब्बल दोन वर्षे झाली तरी मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयात 9 जानेवारीला सुनावणी होणार होती. मात्र, आता ही सुनावणी 4 मार्च रोजी होणार आहे.

मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता जाहीर झालेली असेल. त्यामुळे या निवडणुकांचे भवितव्य लोकसभा निवडणुकीनंतरच ठरण्याची शक्यता आहे. चार मार्चलादेखील सुनावणी पुढे ढकलली जाऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

Supreme Court
Arvind Kejriwal : केजरीवालांसह भगवंत मान गुजरातच्या तुरूंगात... नेमकं काय घडलं?

निवडणुकीला 2025 उजाडणार?

लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर लगेच महाराष्ट्रातील विधानसभेचे पडघम वाजायला सुरुवात होईल. सर्व यंत्रणा त्याच कामात लागलेली असेल. त्यामुळे मुदत संपलेल्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद यांच्या निवडणुका त्याच वर्षी घेणे शक्य होणार नाहीत, असा अंदाज व्यक्त केला जातोय. त्यामुळे या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीसाठी 2025 उजाडण्याची शक्यता आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महापालिकांमध्ये प्रशासकराज

2020 मध्ये कोल्हापूर, औरंगाबाद, नवी मुंबई, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली महापालिकांची मुदत संपली होती, तर पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, नवी मुंबई या महापालिकांची मुदत 2022 मध्ये संपली. बिग बजेट असलेल्या या महापालिकांवर दोन वर्षांपासून प्रशासकराज आहेत. तब्बल 27 हून अधिक महापालिका, 207 नगरपालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे भवितव्य अधांतरीच आहे.

R...

Supreme Court
Assembly Election : भाजपला दे धक्का; दहा दिवसांपूर्वीच शपथ घेतलेल्या मंत्र्यांचा दारुण पराभव

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com