राज्यातील नगर परिषद व नगर पंचायतींच्या मतदानादरम्यान अंबरनाथमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला.
बोगस मतदार, पैसे वाटप आणि EVM हाताळणाऱ्या अधिकाऱ्यांकडे बोगस आयकार्ड सापडल्याचे आरोप झाले आहेत.
या प्रकरणामुळे राजकीय पक्षांसह निवडणूक आयोगही संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
Ambarnath News : राज्यभरात 23 नगर परिषद आणि नगर पंचायतीसाठी मतदान होत असतानाच अंबरनाथमध्ये मोठा गोंधळ, राडा आणि धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. येथे कनाथ शिंदेंच्या शिवसेनेवर बोगस मतदार आणि पैसे वाटल्याचा आरोप भाजप आणि काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी केला आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटताना रंगेहाथ पकडले आहे. यामुळे येथील वातावरण चांगलेच तापले आहे. अशातच आता संशयाच्या ऐन निवडणुकीत निवडणूक आयोगच संशयाच्या भोवऱ्यात सापडला असून EVM हाताळणारे अधिकाऱ्यांकडेच 'बोगस' आयकार्ड सापडले आहेत. यावरून आता नव्या वाद सुरू झाला आहे.
अंबरनाथमध्ये नगर परिषदेसाठी मतदान होत असून सकाळपासून मतदानाला सुरूवात झाली आहे. पण यावेळी अंबरनाथमध्ये बोगस मतदान आणि EVM मधील छेडछाडीने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तसा आरोपच भाजप आणि काँग्रेसकडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवर करण्यात आला आहे. त्यातच भाजपचे दोन कार्यकर्ते शुक्रवारी रात्री प्रभाग क्रमांक 28 मध्ये पैशाची पॉकिट वाटत असताना रंगेहाथ पकडण्यात आले. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांना रंगेहाथ पकडत भरारी पथकाच्या ताब्यात दिलं. सध्या याचा तपास अंबरनाथ पोलिस करत आहेत.
एकीकडे या निवडणुकीत भाजप, काँग्रेस आणि शिंदेंच्या शिवसेनेत जोरदार रस्सी खेच पाहायला मिळत असून आता जोरदार आरोप-प्रत्यारोपाची फैरी झाडल्या जात आहेत. त्यातच मोतोश्री नगर मतदान केंद्राबाहेर भाजपकडून पैसे वाटप केले जात असल्याचा संशयावरून शिवसेनेकडून संशय व्यक्त करण्यात आला. यावरूनच येथे शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने गोंधळ झाला. ज्यानंतर तणाव निर्णाम झाला. ज्यानंतर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करत जमावाला पागंवले होते.
यापाठोपाठ अंबरनाथ कोहोज गाव येथील फादर एंजल्स स्कूल येथे काही पक्षांच्या गाड्या पाठवल्या जात असल्याने शिवसेना आणि काँग्रेस या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. लागलीच पोलिसांनी मध्यस्थी करून वाद मिटला. त्यानंतरही येथे वाद झाल्यानंतर मात्र पोलिसांनी लाठीचार्ज करत जमावाला पागंवलं. या घटानांमुळे येथील राजकीय वातावरण तंग झाले असतानाच अंबरनाथमध्ये आयोगवारच आता संशय येणारी घटना घडली आहे.
येथे आयोगाच्या ईव्हीएम हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे 'बोगस' आयकार्ड असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावरुन उमेदवारांनी आक्षेप घेतला असून हे अंबरनाथच्या ग्रीन सिटी प्रभाग क्रमांक 29 मध्ये हा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. इथल्या मतदान केंद्रावर ईव्हीएम बंद पडल्याने नवीन मशीन आणणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे चक्क बोगस ओळखपत्रे आढळली. या आयकार्डवर फोटो, नाव आणि अधिकाऱ्यांचे शिक्के नसल्याने सर्वच उमेदवारांनी आक्रमक पवित्रा घेत निवडणूक प्रक्रियेवर संशय व्यक्त केला आहे. या गोंधळामुळे मतदान केंद्रावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झालें होतं.
1. अंबरनाथमध्ये नेमका कोणता गोंधळ झाला?
➡️ मतदानादरम्यान बोगस मतदार, पैसे वाटप आणि EVM संदर्भात गंभीर आरोप झाले.
2. कोणत्या पक्षांवर आरोप करण्यात आले आहेत?
➡️ शिंदे गटाची शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यावर परस्पर आरोप झाले.
3. EVM संदर्भात काय धक्कादायक बाब समोर आली?
➡️ EVM हाताळणाऱ्या अधिकाऱ्यांकडे बोगस मतदार ओळखपत्रे सापडल्याचा आरोप आहे.
4. निवडणूक आयोगाची भूमिका काय आहे?
➡️ या प्रकरणामुळे निवडणूक आयोगही संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
5. या घटनेचा निवडणुकीवर काय परिणाम होऊ शकतो?
➡️ मतदान प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.