Municipal Election : निवडणुकीच्या धामधूमीत भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार; मुख्यमंत्र्यांच्या सभेआधीच अंबरनाथ हादरले
अंबरनाथमध्ये भाजप उमेदवार पवन वालेकर यांच्या कार्यालयावर मध्यरात्री गोळीबार करण्यात आला.
ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून दहशत पसरवण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय आहे.
आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा असल्याने पोलीस सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
Ambernath Municipal Election : अंबरनाथ नगरपालिकेची निवडणूक अगदी दोन दिवसांवर आली असताना, शहरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील पश्चिम भागातील नवीन भेंडी पाडा परिसरात भाजपचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या संपर्क कार्यालयावर गोळीबार करण्यात आला आहे. ही घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाला असून काही अज्ञातांनी हा गोळीबार केल्याचे समोर येत आहे. धक्कादायक म्हणजे आज, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अंबरनाथमध्ये जाहीर सभा आहे. पण या आधीच ही घटना घडल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेले माहिती अशी की, न्यायालयीन अपील दाखल झालेल्या नगरपरिषदा व नगरपंचायती मधील सार्वत्रिक निवडणुकांसाठी सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार अंबरनाथ नगर परिषदेची निवडणूक देखील पुढे ढकलण्यात आली होती. येथे आता 20 डिसेंबरला मतदान होणार असून राज्यातील इतर नगरपंचायत आणि नगरपालिकेच्या बरोबरच 21 तारखेला निकाल लागणार आहे. सध्या येथे सर्वच राजकीय पक्ष जोरदार मोर्चे बांधणी करताना दिसत असून भाजपने देखील प्रचाराकडे विशेष लक्ष दिले आहे. दरम्यान आज फडणवीस यांची अंबरनाथमध्ये जाहीर सभा होणार आहे.
मात्र त्याचआधी येथे भाजप उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर बुधवारी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास गोळीबार करण्यात आलाय. या गोळीबारामागे उमेदवाराला धमकावण्याचा आणि निवडणुकीत दहशत माजवण्याचा उद्देश असल्याचे पोलिसांचे सांगितले आहे.
तर दुचाकीवरून दोन अज्ञात इसम आले आणि त्यांनी कार्यालयाच्या समोर उभे राहून कार्यालयाच्या दिशेने 3-4 राऊंड फायर केले. गोळीबाराचा आवाज ऐकून कार्यालयातील सुरक्षारक्षक बाहेर आले असता त्यांच्या दिशेनेही हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या. सुदैवाने या गोळीबारात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाळेकर यांचा सुरक्षारक्षक जखमी झाला आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.
या प्रकरणानंतर अंबरनाथ पोलीस ठाण्यात भाजप कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. तर भर वस्तीत अशा पद्धतीने गोळीबार झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणातील अज्ञात दोन व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र पोलिसांना गोळीबार करणाऱ्यांचे नाव सांगूनही गुन्हा दाखल केला जात नसल्याचा आरोप भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केला आहे.
FAQs :
1. गोळीबाराची घटना नेमकी कुठे घडली?
➡️ अंबरनाथमध्ये भाजप उमेदवार पवन वालेकर यांच्या पॅनल क्रमांक चारच्या कार्यालयावर.
2. ही घटना कधी घडली?
➡️ मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली.
3. या घटनेत कोणी जखमी झाले आहे का?
➡️ सध्या जखमी झाल्याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
4. ही घटना कुठे कैद झाली आहे का?
➡️ होय, संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
5. या घटनेमुळे राजकीय वातावरणावर काय परिणाम होऊ शकतो?
➡️ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय तणाव वाढण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

