BJP Dilip Bhoir joins Shivsena devendra fadnavis And eknath shinde sarkarnama
कोकण

Shivsena Vs BJP Politics : शिवसेनेची रायगडमध्ये भाजपवर कुरघोडी? माजी उपाध्यक्ष फोडला

BJP Dilip Bhoir joins Shivsena : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय पक्षांमध्ये हालचालींना वेग आला आहे. मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश होताना दिसत आहेत.

Aslam Shanedivan

Raigad News : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोकणात मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश होताना दिसत आहेत. भाजपप्रमाणेच शिवसेनेत देखील प्रवेश वाढले आहेत. दरम्यान भाजपमधून काही नेते शिवसेनेत प्रवेश करताना दिसत आहेत. यामुळे कोकणातील अलिबागमध्ये दोस्तीत कुस्ती होताना दिसत असून नेत्यांची पळवापळवी होताना दिसत आहे.

नुकताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील निलंबीत सुधाकर बडगुजर यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश करत अनेकांना धक्का दिला होता. असाच धक्का भाजपला कोकणातील रायगडच्या अलिबागमध्ये दिलीप भोईर यांनी कार्यकर्त्यांसमवेत दिला आहे. भोईर हे रायगड भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष असून त्यांनी विधानसभा निवडणुकीत बंडखोरी केली होती. त्यांनी महायुतीच्या उमेदवाराविरुद्ध निवडणूक लढल होती. पण आज त्यांनी शिवसेना मंत्री भरत गोगावले (Bharat gogawale) आणि आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला.

गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी महायुतीच्या जागावाटपात ही जागा शिवसेनेला गेली होती. त्यावेळी त्यांनी बंडखोरी करत महेंद्र दळवी यांच्या विरोधात दंड थोपाटले होते. त्यांना अपक्ष म्हणून महेंद्र दळवी आणि शेकापच्या उमेदवारांना आव्हान निर्माण करत 33 हजार मतं मिळवली होती. त्यामुळे त्यांची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली होती.

पण आता, त्यांच्या शिवसेना पक्षप्रवेशामुळे शिवसेनेची ताकद वाढली आहे. विशेष म्हणजे ज्यांच्या विरोधात भोईर यांनी दंड थोपाटले त्यांच्याच उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे. यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुकीत शिवसेनेची ताकद वाढली आहे. तसेच आमदार महेंद्र दळवी यांचीही मतदारसंघावर पकड अधिक मजबूत होण्यास मदत मिळणार आहे. तर दुसरीकडे शेतकरी कामगार पक्षाला भविष्यात मोठं आव्हान निर्माण झालं आहे.

यावेळी मंत्री भरत गोगावले यांनी, भोईर यांच्या प्रवेशाने शिवसेनेची ताकद वाढली आहे. त्यांचा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. दरम्यान आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर युती न करण्यावरून आधीच शिवसेनेच्या आमदारांनी आपली भूमीका स्पष्ट केली होती. पण आता गोगावले यांनी राष्ट्रवादीबरोबर जाण्यावर भाष्य केल्याने रायगडमध्ये शिवसेनेत दोन प्रवाह पहायला मिळत आहेत.

गोगावले यांनी रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत आणि येथील युतीबाबत तिन्ही पक्षाचे नेते ठरवतीत. त्यांचा जो निर्णय असेल तो मान्य असेल असे स्पष्टीकरण दिले होते. पण आमदार महेंद्र दळवी यांनी गोगावले यांच्या भूमिकेला छेद देताना, गोगावले यांची भूमिका पक्षाची भूमिका असू शकते. मात्र आमच्या नेत्यांच्या विरोधात वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसने बंद करावीत. अन्यथा वेगळी व्यूहरचना करावी लागेल, असा इशारा महेंद्र दळवी यांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT