Rajan Teli, Deepak Kesarkar Sarkarnama
कोकण

BJP Vs Shivsena Video : "केसरकरांना मदत केली तर जनता माफ करणार नाही..." सावंतवाडी मतदारसंघावरून भाजप-शिंदे गटात जुंपली

Jagdish Patil

Sindhudurg News, 08 Sep : सावंतवाडी मतदारसंघात भाजपचे माजी आमदार राजन तेली व शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्यात पुन्हा एकदा जुंपली आहे. केसरकरांना मदत केली तर सावंतवाडीची जनता आम्हाला माफ करणार नाही.

त्यामुळे हा मतदार संघ भाजपला मिळावा अशी मागणी भाजपच्या वरीष्ठ नेत्यांना केल्याची माहीती दिल्याचं राजन तेली यांनी सांगितलं आहे. तर तेली यांना सर्वसामान्य लोकांशी काही देणघेणं नाही त्यांचं लक्ष दुसरीकडे आहे, असा टोला मंत्री केसरकर यांनी लगावला आहे.

त्यामुळे आता पुन्हा सावंतवाडी मतदारसंघावरून भाजप (BJP) आणि शिंदेसेना आमने-सामने आल्याचं पाहायला मिळत आहे. विधानसभेसाठी भाजप सावंतवाडी मतदारसंघावर दावा करताना दिसत आहे. येथून माजी आमदार राजन तेली यांनी दोन वेळा अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आहे. मात्र, आता हा मतदारसंघ भाजपला मिळावा यासाठी तेली यांनी फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे.

तर विद्यमान आमदार दीपक केसरकर देखील हा मतदारसंघ शिवसेनेला (Shivsena) मिळावा आणि तो सेनेचाच आहे, यावर ठाम आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या जागावाटपात सावंतवाडीवरून महायुतीत मोठी पेच निर्माण होणार असल्याचं चित्र दिसत आहे.

अशातच आता राजन तेली यांनी शिवसेना शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांना डिवचलं आहे. "केसरकर माझे वैयक्तिक दुष्मन नाहीत. मात्र त्या माणसाचा उपयोग या मतदारसंघाला होणार नसेल आणि आम्ही युती म्हणून त्यांना मदत केली, तर सावंतवाडीची जनता आम्हाला माफ करणार नाही. ते 15 वर्ष आमदार, 8 वर्षे मंत्री राहिले तरी या मतदारसंघात काही केलं नाही."

अशी टीका त्यांनी केसरकरांवर केली. शिवाय हा मतदारसंघ भाजपला मिळावा अशी मागणी आपण भाजपच्या वरीष्ठ नेत्यांना केल्याची माहीती देखील तेली यांनी दिली. तर तेली यांच्या याच वक्तव्यावर मंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. केसरकर म्हणाले, "सावंतवाडी मतदारसंघात पूर्वी काय चित्र होतं हे त्यांना माहीती नसेल. आज चांगला दिवस आहे कशाला कोणाचं नाव घेता. सर्वसामान्य लोकांशी त्यांना काही देणघेणं नाही त्यांचा लक्ष दुसरीकडे आहे," असं म्हणत केसरकर यांनी राजन तेलींच नाव न घेता टोला लगावला.

शिवाय फक्त मी केलेल्या कामाच्या ठिकाणी नारळ फोडणे येवढंच काम राजन तेलींनी केलं असा जोरदार पलटवार दिपक केसरकरांनी केला आहे. "या मतदारसंघात नवीन हॉस्पिटल होतं का? क्रिडा संकुल होतं का? आता नवीन हॉस्पीटल झाली पंचायत समितीच्या इमारती उभ्या राहिल्या. सर्वसामान्य माणसाचा झालेला विकास त्यांना दिसत नाही," असंही केसरकर म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT