Shivsena News : "राणे, शिंदे आणि मी मुख्यमंत्री होऊ नये म्हणून उद्धव ठाकरेंनी..." रामदास कदमांचा खळबळजनक गौप्यस्फोट

Ramdas Kadam On Uddhav Thackery : शिवसेना पक्ष फुटीपासून उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेत अनेक गौप्यस्फोट करणारे एकनाथ शिंदे गटाचे नेते रामदास कमद यांनी आता आणखी एक खळबळजनक दावा केला आहे.
Narayan Rane, Eknath Shinde, Uddhav Thackeray, Ramdas Kadam
Narayan Rane, Eknath Shinde, Uddhav Thackeray, Ramdas KadamSarkarnama
Published on
Updated on

Shivsena News, 08 Sep : शिवसेना पक्ष फुटीपासून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेत अनेक गौप्यस्फोट करणारे एकनाथ शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी आता आणखी एक खळबळजनक दावा केला आहे.

मी मुख्यमंत्री होईल याची उद्धव ठाकरेंना भीती होती. त्यामुळेच त्यांनी मी मागितलेला मतदारसंघ न देता मला दुसरा मतदारसंघ देऊन पाडल्याचा दावा कदम यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांनी माझ्यासह नारायण राणे आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री होऊ नये म्हणून कारवाया केल्याचा आरोपही कदम यांनी केला आहे.

...म्हणून शिवसेना फुटली

कदम म्हणाले, मला बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री बनवतील अशी भीती उद्धव यांना होती. म्हणून मी दापोली मतदारसंघ मागितला असतानाही त्यांनी मला मुद्दाम गुहागर मतदारसंघातून उभं करून माझा पराभाव करण्यासाठी काही नेत्यांना कामाला लावलं. उद्धव ठाकरेंच्या या राक्षसी महत्त्वकांक्षेमुळेच आज शिवसेना (Shivsena) फुटली असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

Narayan Rane, Eknath Shinde, Uddhav Thackeray, Ramdas Kadam
Balasaheb Thorat Vs Devendra Fadnavis : फडणवीस चक्रव्युहात कसे अडकले; थोरात म्हणाले, 'नको ते उद्योग केले'

उद्धव ठाकरे आयत्या बिळावर नागोबा

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आयत्या बिळावर नागोबा झाले आहेत त्यांनीच आम्हाला बाजूला व्हायला भाग पाडल्याचा आरोप देखील कमद यांनी यावेळी केला. ते म्हणाले, "बाळासाहेबांचा पुत्र म्हणून उद्धव ठाकरेंना आयती गादी मिळाली आहे. त्यांनी कधी आपल्या अंगावर केसेस घेतलेल्या नाहीत.

ते आयत्या बिळावर नागोबा झाले आहेत. त्यांनी नेहमी मराठी माणसात फूट पाडण्याचं काम केलं. आम्हालाच बाजूला व्हायला भाग पाडलं. आज ते काँग्रेसचे पाय चाटत आहेत. आम्ही तर शिवसेना प्रमुखांची विचारधारा पुढे घेऊन जात आहोत."

Narayan Rane, Eknath Shinde, Uddhav Thackeray, Ramdas Kadam
Mahayuti News : महायुतीचा सत्ता राखण्यासाठीचा प्लॅन तयार; तीन पक्षांनी घेतली इतक्या जागांची जबाबदारी

दरम्यान, नुकतेच काही दिवसांपूर्वी कमद यांनी उद्धव ठाकरेंबाबत एक गौप्यस्फोट केला होता. शिवसेनेची साथ सोडून गुवाहाटीला गेलेले आमदार मी दोन तासांत परत 'मातोश्री'वर आणतो. पण तुम्ही काँग्रेसची साथ सोडा, असं मी उद्धव ठाकरेंनी सांगितलं होतं. शरद पवारांची भेट घेतल्यानंतर त्यांनी माझं ऐकलं नाही, असं कमद यांनी सांगितलं होतं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com