Yogesh Kadam sarkarnama
कोकण

Yogesh Kadam : कोकणात भाजप-शिवसेना वॉर सुरूच, ' ते मंत्री झाले तरीही...', माजी आमदाराचा कदमांवर प्रहार

Suryakant Dalvi On Yogesh Kadam : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुकांसाठी रणधुमाळी सुरू झाली असून नामांकन अर्ज दाखल करण्यास देखील सुरूवाज झाली आहे.

Aslam Shanedivan

  1. भाजपचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी खेडमधील विकास कामांवरून मंत्री योगेश कदम यांच्यावर टीका केली.

  2. रवींद्र चव्हाण येणार समजल्यावरच काम झाले, असा टोला दळवींनी लगावला.

  3. “सोबत आले तर ठीक, नाहीतर एकटेच लढू” या वक्तव्यामुळे महायुतीत वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Ratnagiri News : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या असून नगरपालिका आणि नगर परिषदांचे नामांकन अर्ज भरण्यास (ता.10) सुरूवात झाली आहे. शेवटची तारीख 17 असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या लोकांनी बैठका, दौरे सुरु केले आहेत. पक्ष कार्यालयांच्या उद्घाटन सोहळ्यांना देखील आता वेग आला आहे. अशात आता भाजपने पुन्हा एखदा शिंदेंच्या शिवसेनेला डिवचले असून थेट मंत्री योगेश कदम यांनाच टार्गेट करण्यात आले आहे. भाजपचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी योगेश कदम यांच्यावर जहरी टीका केली आहे. यामुळे खेडमध्ये ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

राज्यात महायुतीत असणारे पक्ष एकत्र लढणार की स्वतंत्र लढणार? याची देखील जोरदार चर्चा सुरु आहे. अशातच रत्नागिरी जिल्ह्यात मात्र, महायुतीमधील राजकीय वातावरण चांगलेच गरम झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात भाजपचे नेते एकला चलो ची भूमिका घेत असल्याचं चित्र दिसत आहे. अशातच राजकीय नेते देखील ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. खेड मधील भाजपा कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्या दरम्यान भाषण करताना भाजपचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांची मंत्री योगेश कदम यांच्यावर जोरदार टीका केली आहे.तसेच भाजप नेते वैभव खेडेकर यांच्यानंतर दळवी यांनी देखील स्वबळाचा नारा दिला आहे. यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

खेड नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून महायुतीतील शिंदेंची शिवसेना, भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीत एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना व शरद पवारांची राष्ट्रवादी व घटक पक्षांनी देखील महाविकास आघाडी म्हणून लढण्याबाबतची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. महायुतीची शुक्रवारी मुंबईत झालेल्या बैठकीत महायुतीच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब झाला आहे. मात्र अद्याप नगराध्यक्षपदासाठी सर्वच पक्ष आग्रही असल्याने येथे मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे.

दरम्यान,भाजप नेते वैभव खेडेकर यांच्यानंतर भाजपचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी महायुतीत मिठाचा खडा टाकणारे वक्तव्य केलं आहे. त्यांनी, खेडमधील रस्त्यांच्या अवस्थेवरून शिवसेना नेते तथा मंत्री योगेश कदम यांना डिवचलं आहे. दळवी यांनी, कदम निवडून येऊन मंत्री झाले तरीही खेडमधील रस्त्यांची अवस्था वाईटच आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष इकडे येणार असल्यानेच एका रात्रीत रस्ते कसे चकाचक करण्यात आले. यामुळे एकदा जनतेनंच आता विचार करावा की खेड नागपरिषदेत बदल झाला तर काय होणार?

आमदार निरंजन डावखरे यांच्या समोरच दळवी यांनी भाजपच्या एकला चलो रे बाबत सूचक वक्तव्य केले. त्यांनी, नगरपालिकांसह नगरपरिषदेच्या निवडणुकीबाबतही भाष्य करताना, कोणी सोबत आले तर ठीक अन्यथा त्यांच्याशिवाय आपण लढू, असे म्हटले आहे. तसेच त्यांनी जिल्ह्यात परिवर्तनाचा पहिला बॉम्ब खेडमध्ये फुटतो. तर दापोली विधानसभा मतदारसंघ दत्तक घ्यावा असाही सल्ला दळवी यांनी निरंजन डावखरे यांना दिला.

दळवी यांच्या वक्तव्यानंतर भाजपकडून स्वबळाचा नारा दिला जात आहे. शिवसेनेना डिवचलं जात असल्याची चर्चा जिल्ह्यात आता रंगू लागली आहे. तसेच आधीच पालकमंत्री उदय सामंत आणि मंत्री नितेश राणे यांच्या वादामुळे महायुतीत तणाव वाढला आहे. अशातच माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी देखील मंत्री कदम यांना डिवचत एकला चलोचा नारा दिल्याने महायुतीत आणखी तणाव वाढण्याची शक्यता आहे. तर या टीकेवर मंत्री कदम कोणतं उत्तर देतात हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.

FAQs :

1. सूर्यकांत दळवी यांनी कोणावर टीका केली?
त्यांनी मंत्री योगेश कदम यांच्यावर रस्त्यांच्या वाईट अवस्थेबद्दल टीका केली.

2. रस्त्यांबाबत त्यांनी काय म्हटलं?
रवींद्र चव्हाण येणार समजल्यावरच रस्त्यांचे काम झाले, असा टोला त्यांनी लगावला.

3. ‘एकला चलो रे’ वक्तव्याचा अर्थ काय?
त्याचा अर्थ – सोबत कोणी आले नाही तरी आम्ही स्वबळावर लढू.

4. या वक्तव्यामुळे काय परिणाम होऊ शकतो?
महायुतीमध्ये अंतर्गत मतभेद आणि वाद वाढण्याची शक्यता आहे.

5. हे वक्तव्य कुणाच्या उपस्थितीत करण्यात आलं?
हे वक्तव्य आमदार निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत करण्यात आलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT