Yogesh Kadam update : घाबरू नका... एकनाथ शिंदेंचं योगेश कदमांना अभय : सोबत जेवण करताना काय चर्चा झाली?

Eknath Shinde assurance News : गृहराज्य मंत्री योगेश कदम यांच्या सहीनंतर सचिन घायवळ याला शस्त्र परवाना मिळाल्याचा आरोप होताच, कदम यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 'मुक्तगिरी'वर जाऊन भेट घेतली.
Minister Yogesh Kadam Visit Flood Affected Marathwada News
Minister Yogesh Kadam Visit Flood Affected Marathwada Newssarkarnama
Published on
Updated on

Mumbai news : राज्यातील वातावरण गेल्या काही दिवसापासून आरोप-प्रत्यारोपामुळे चांगलेच गाजत आहे. सत्ताधारी व विरोधकांकडून एकमेकांना लक्ष्य केले जात असल्याने वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. दसरा मेळाव्याप्रसंगी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते व माजी मंत्री रामदास कदम यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाविषयी खळबळजनक आरोप केले होते. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून कदम पिता-पुत्रांना टार्गेट करण्यात आले होते.

यापूर्वीच आईच्या नावे असलेल्या डान्सबारवरून योगेश कदम यांच्या समोरील अडचणी वाढल्या असतानाच आता गुंड निलेश घायवळ यांचा भाऊ सचिन घायवळ याच्या शस्त्र परवाना प्रकरणात योगेश कदम अडचणीत आले आहेत. गृहराज्य मंत्री योगेश कदम यांच्या सहीनंतर सचिन घायवळ याला शस्त्र परवाना मिळाल्याचा आरोप होताच, कदम यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 'मुक्तगिरी'वर जाऊन भेट घेतली. या भेटीवेळी शस्त्र परवाना वादात एकनाथ शिंदेंकडून त्यांना 'अभय' मिळाला आहे.

विरोधकांनी गृहराज्य मंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांच्या सहीनंतर सचिन घायवळ याला शस्त्र परवाना मिळाल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे आता विरोधकांनी सरकारवर जोरदार टीकेली झोड उठवली आहे, पुन्हा एकदा योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे, विरोधकांकडून योगेश कदम यांच्या कोंडीचा प्रयत्न सुरू आहे. शिवसेना ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे, त्यामुळे योगेश कदम यांच्या अडचणी वाढल्या असतानाच आता योगेश कदम यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शुक्रवारी सकाळी भेट घेतली.

Minister Yogesh Kadam Visit Flood Affected Marathwada News
BJP Politics: भाजपच्या 'एकला चलो रे' वर आज मंथन, शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाची अस्वस्थता दूर होणार का?

योगेश कदम यांनी ठाण्यातील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 'मुक्तगिरी' या निवासस्थानी भेट दिली. यावेळी दोन तास पेक्षा अधिकवेळ कदम यांना ताटकळत ठेवण्यात आले होते. घायवळ यांना शस्त्र परवाना दिल्याने ते वादात अडकल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन कदम यांनी त्यांची बाजू मांडली. यावेळी एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी योगेश कदम यांना दिलासा दिला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे हे योगेश कदम यांच्या पाठीशी आहेत. चुकीचे केले नसेल तर घाबरायचे कारण नाही, विरोधकांच्या टीकेला जशास तसे उत्तर द्या, असे एकनाथ शिंदे यांनी योगेश कदम यांंना सांगितल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

Minister Yogesh Kadam Visit Flood Affected Marathwada News
Yogesh Kadam : घायवळ प्रकरण : मुख्यमंत्र्यांना शेवटची संधी, योगेश कदमांची हकालपट्टी करा; अन्यथा थेट… अनिल परबांनी घेतला मोठा निर्णय

योगेश कदम यांनी या प्रकरणानंतर आपली भूमिका एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडली आहे. मुक्तागिरी बंगल्यावर योगेश कदम हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी गेले होते, यावेळी एकनाथ शिंदे आणि कदम यांची भेट झाली. कदम यांच्यावरील आरोपांमुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत असल्याचा पक्षातील नेत्यांमध्ये सूर असल्याची देखील माहिती समोर येत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे काय कारवाई करणार का ? याची उत्सुकता शिगेला पोंहचली असतानाच त्यांनी त्यांच्या कामाविषयी समाधान व्यक्त केले.

Minister Yogesh Kadam Visit Flood Affected Marathwada News
Shivsena UBT : मुंबई-पुणे जिंकण्यासाठी उद्धव ठाकरेंनी मोहरे हेरले : 5 नेत्यांवर महत्वाची जबाबदारी

एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी शिंदे आणि योगेश कदम यांच्यात जेवण करता -करता चर्चा झाली. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 40 मिनिटे चर्चा झाली. जर चुकीचे काही केल नसेल तर घाबरू नका, विरोधकांना जशास तसे उत्तर द्या, अशा सूचना यावेळी शिंदे यांनी कदम यांना दिल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे या प्रकारानंतरही योगेश कदम यांना पुन्हा एकदा अभय मिळाला आहे.

Minister Yogesh Kadam Visit Flood Affected Marathwada News
Ramdas Kadam son controversy : मुलगा अडचणीत येताच आक्रमक रामदास कदमांची तलवार म्यान: बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूप्रकरणात दोन पावलं मागे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com