मनसेचे माजी नेते वैभव खेडेकर यांचा तीनदा पक्षप्रवेश पुढे ढकलल्यानंतर अखेर आज भारतीय जनता पक्षात प्रवेश झाला.
या प्रवेशामुळे खेड तालुक्यातील राजकीय समीकरणं मोठ्या प्रमाणात बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
खेडेकर यांच्या समर्थकांनी त्यांच्या भाजप प्रवेशाचे स्वागत करत मोठा दिलासा व्यक्त केला आहे.
Ratnagiri News : तळकोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात आगामी स्थानिकच्या तोंडावर आज महत्वपूर्ण राजकीय घडामोड झाली. एकीकडे राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यासोबत महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेतली. याची राज्यात जोरदार चर्चा सुरू असतानाच भाजपने मनसेतून हकालपट्टी केलेल्या आणि पक्षप्रवेशाची हॅट्रीक हुकलेल्या वैभव खेडेकर अखेर प्रवेश करून घेतला. भाजप अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला. यामुळे भाजपने एकाच वेळी अनेकांना धक्का दिलाच सोबत ऑफर देणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या तोंडचा घासही पळवल्याची आता चर्चा सुरू झाली आहे.
पण आज (ता.14) अखेर खेडेकर यांच्यासह त्यांच्या समर्थकांचा भाजपमध्ये प्रवेश झाला. यामुळे त्यांच्यासह त्यांच्या समर्थकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. यापूर्वी त्यांचा पक्षप्रवेश हुकल्याने राजकीय वर्तुळात मानापमानाची चांगलीच चर्चा रंगत होती. यावेळी खेडेकर यांनी अक्षय फाटक, जिल्हाध्यक्ष सतीश मोरे आणि रवींद्रबाबू यांचे आभार मानत, रवींद्रबाबू यांना धन्यवाद देतो की तुम्ही मला आपल्या परिवारामध्ये या ठिकाणी सामावून घेतले, हा प्रवेश महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीत एक नवीन समीकरण निर्माण करू शकतो, अशा भावना व्यक्त केल्या.
तसेच खेडेकर यांनी रखडलेल्या पक्षप्रवेशावर देखील आपली भावना व्यक्त केली. ते म्हणाले, पक्षप्रवेश कोणी रखडवला हे आत्ताच सांगण्यासारखं नाही. त्यासाठी मला सविस्तर मुलाखत घ्यावी लागेल. पण मी जरुर इतकेच सांगेन की, आजचा दिवस त्यावर बोलण्याचा नाही. मात्र माझ्या देवाने (राज ठाकरे) स्वत:पासून मला दूर केलं, काही कारणं झाली असतील. पण आता दुरावा निर्माण झाल्याने मला दुःख होतं आहे.
आता जोमाने भाजप वाढवण्यावर आमचा भर असणार असून स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत शतप्रतिशत भाजपला निवडून आणण्यासाठी माझे प्रयत्न असतील. मनसेशी एक नाळ सुळली होती. पण आज ती थांबली आता भाजपनं मला आपलंसं केलंय याचा आनंद वाटतं असल्याचेही खेडेकर यांनी म्हटलं आहे.
खेडमधील मनसेचे पूर्वाश्रमीचे नेते तर माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांचा मागील तीन वेळा पक्षप्रवेश लांबणीवर पडला होता. दरवेळी पक्षप्रवेशाच्या चर्चा सुरू असतानाच कोणती ना कोणती अडचण समोर येत होती. त्यामुळे त्यांच्या राजकीय भवितव्यासंदर्भात संभ्रमाचे वातावरण तयार झाले होते. त्यांच्या प्रवेशात राज ठाकरे यांचा अडसर आहे. तेच खेडेकर यांचा प्रवेश रोखत आहेत, अशा चर्चा सुरू झाल्या होता.
एखाद्या कार्यकर्त्याचा अशा पद्धतीने तीन तीनदा पक्षप्रवेश होत नाही. यामुळे त्याचे खच्चीकरण होत थेट उद्योग मंत्री उदय सामंत यांनी टीका केली होती. तसेच खेडेकर तयार असतील तर जे भाजपने केले तसे आम्ही तीन तीनदा प्रवेश रोखणार नाही असा शब्द देत असल्याचे सांगत खेडेकरांना थेट शिवसेनेची ऑफरच दिली आहे.
शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का
दरम्यान, आजच्या या पक्ष प्रवेशावेळी ठाकरेंच्या शिवसेनेलाही मोठा धक्का बसला. राज्य संघटक ॲड. ललिता शाम पाटील आणि अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक पराग पाटील यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशामुळे उत्तर महाराष्ट्रात ठाकरेंना मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. मुंबईमध्ये एका कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.
प्र.१: वैभव खेडेकर कोणत्या पक्षातून भाजपमध्ये दाखल झाले?
👉 वैभव खेडेकर मनसे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) पक्षातून भाजपमध्ये दाखल झाले.
प्र.२: त्यांचा पक्षप्रवेश किती वेळा पुढे ढकलला गेला होता?
👉 त्यांचा पक्षप्रवेश तीन वेळा पुढे ढकलला गेला होता.
प्र.३: या प्रवेशाचा खेडमधील राजकारणावर काय परिणाम होईल?
👉 खेडमधील राजकीय समीकरणे बदलतील आणि भाजपला स्थानिक स्तरावर बळकटी मिळेल.
प्र.४: वैभव खेडेकर यांच्या प्रवेशाला समर्थकांची प्रतिक्रिया काय आहे?
👉 समर्थकांनी मोठा दिलासा व्यक्त करत आनंद साजरा केला आहे.
प्र.५: हा प्रवेश कोणत्या नेत्यांच्या उपस्थितीत झाला?
👉 हा प्रवेश भाजपच्या स्थानिक आणि जिल्हा नेतृत्वाच्या उपस्थितीत झाला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.