
खेड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाची जागा खुल्या महिला प्रवर्गासाठी राखीव ठरली, ज्यामुळे पुरुष उमेदवारांचे गणित बिघडले आहे.
मनसेकडून हकालपट्टी आणि भाजपकडून प्रवेश नाकारल्यानंतर, माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांना आणखी एक धक्का बसला आहे.
या आरक्षण सोडतीनंतर खेडमधील राजकीय समीकरणात बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Raigad News : मिनी विधानसभा म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगूल आता खऱ्या अर्थाने वाजला असून राज्यातील 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत आज जाहीर झाली. यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. ज्यात मनसेनं हकालपट्टी केलेल्या तर भाजपने दुसऱ्यांदा प्रवेश रोखलेल्या खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांचाही यात समावेश आहे. खेडेकर हे भाजपमध्ये प्रवेश करून दुसऱ्यांदा नगराध्यक्षपदाचे स्वप्न पाहत होते.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पहिला टप्प्यात नगरपालिका, नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या अध्यक्षपदाच्या आरक्षणाची आज सोडत झाली. ज्यात 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींमधील नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची घोषणा झाली. यामध्ये 33 नगरपरिषदांपैकी 17 नगरपरिषदेसाठी अनुसूचित जातीच्या महिला तर 67 नगरपरिषदपैकी 34 नगरपरिषदांवर ओबीसी महिलांसाठी आरक्षित करण्यात आले आहे.
यामुळे तब्बल 51 नगरपालिका आणि नगरपंचायतींवर लाडक्या बहिणींच्या हाती सत्ता पाहायला मिळणार आहे. ज्यात खेड नगरपरिषदेचा समावेश आहे. खेड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाची जागा ही खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाली आहे. यामुळे खेडेकर यांना धक्का बसल्याचे बोलले जात आहे.
मनसेच्या स्थापनेपासून खेडेकर हे राज ठाकरे यांच्याबरोबर होते. तळकोकणासह कोकणात पक्ष वाढविण्यासह पक्षाच्या बांधणीत महत्वाचे काम केले. त्याचबरोबर खेड नगर पालिकेवर मनसेचा झेंडा रोवण्यासह नगराध्यक्ष होण्याचेही त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती.
दरम्यान काही दिवसांपूर्वी मनसेतून खेडेकर यांची हकालपट्टी करण्यात आली. खेडेकर यांच्यांवर पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. राज ठाकरे यांच्या सूचनेनंतर त्यांच्यावर ही कारवाई केल्याचे जाहीर करण्यात आले.
ज्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचे जाहीर केले. याबाबत मंत्री नितेश राणे यांनी देखील घोषणा केली. तर खेडेकर यांनी मुंबईत जावून मोठे शक्तिप्रदर्शन देखील केले होते. त्यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याशी चर्चाही केली. मात्र त्यांचा दुसऱ्यांदा प्रवेश रखडला.
एकीकडे दुसऱ्यांदा भाजपने प्रवेश रोखल्याने त्यांना राज ठाकरे यांनीच धक्का दिल्याची चर्चा आहे. तोच आता खेडचे नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षणही महिलेसाठी राखीव झाल्याने खेडेकर यांना दुहेरी धक्का बसला आहे. सोबतच त्यांचे दुसऱ्यांदा नगराध्यक्षपदाचे स्वप्नही भंगले आहे.
प्रश्न 1: खेड नगराध्यक्षपद कोणत्या प्रवर्गासाठी राखीव झाले आहे?
👉 खेड नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाले आहे.
प्रश्न 2: वैभव खेडेकर यांना “डबल धक्का” का बसला?
👉 कारण त्यांना आधी मनसेकडून हकालपट्टी झाली आणि भाजपनेही प्रवेश नाकारला; आता आरक्षणामुळे ते निवडणुकीत उतरू शकत नाहीत.
प्रश्न 3: ही आरक्षण सोडत कधी जाहीर झाली?
👉 आजच मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सोडतीचा निकाल जाहीर झाला.
प्रश्न 4: खेडेकर यांचा राजकीय पुढचा मार्ग कोणता असू शकतो?
👉 सध्या स्पष्ट नाही, मात्र नवीन पक्ष किंवा गटासोबत जाण्याची शक्यता राजकारणात चर्चेत आहे.
प्रश्न 5: या आरक्षणामुळे कोणत्या पक्षांना फायदा होईल?
👉 महिला उमेदवारांना संधी मिळणार असल्याने स्थानिक स्तरावर भाजपा, शिवसेना आणि काँग्रेसच्या महिला नेत्यांमध्ये चुरस वाढेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.