
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांचा भाजप प्रवेश तिसऱ्यांदा रखडला असून त्यांनी पुन्हा भाजप नेते रवींद्र चव्हाण आणि प्रवीण दरेकर यांची भेट घेतली आहे.
या भेटींनंतरही त्यांच्या प्रवेशाबाबत अधिकृत घोषणा न झाल्याने राजकीय चर्चांना ऊत आला आहे.
‘राज’ ठाकरे यांच्या कृपेचा हात सुटल्यानंतर खेडेकर यांची राजकीय परिस्थिती अधिकच बिकट झाल्याचे बोलले जात आहे.
Ratnagiri News : गेल्या काही दिवसांपासून खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांचा भाजप प्रवेश रखडला जातोय. त्यांच्या प्रवेशात नक्की कोणता अडथळा आहे, कोणती माशी शिंकली अशा चर्चा सध्या सुरू आहेत. या चर्चा सुरू असतानाच खेडेकर यांनी बुधवारी (ता.8) दुसऱ्यांदा भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली आहे. याचबरोबर त्यांनी कॅबिनेट दर्जा मिळालेले भाजप नेते स्वयंम पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांचीही भेट घेतली आहे. या भेटींमुळे आता विविध राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत.
महायुतीच्या संपर्कात असल्याने तसेच भाजपचे नेते मंत्री नितेश राणे यांच्याबरोबर उठबस केल्याच्या कारणामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तळकोकणातील नेते वैभव खेडेकर यांच्यावर कारवाई केली. त्यांच्याबरोबर इतर तिघांची हकालपट्टी केली. यादरम्यानच्या काळात त्यांची भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेशी जवळीक वाढली होती. त्यामुळे ते महायुतीच्या वाटेवर असल्याचे बोलले जात होते.
तर हकालपट्टीची कारवाई होताच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचे निश्चित केले. यानंतर लगेच त्यांचा भाजप प्रवेश होईल अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, अद्यापही त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होऊ शकलेला नाही. त्यांचा भाजपने तीन वेळा पक्ष प्रवेश पुढे ढकलला. यामुळेच शिवसेनेचे नेते उद्योगमंत्री यांनी देखील भाजपची फिरकी घेत थेट खेडेकर यांनी शिवसेनेची ऑफर दिली. तसेच जे भाजपने तीन तीनदा केलं ते आम्ही करणार नाही असा शब्द देत असल्याचेही म्हटलं.
सामंत यांच्या या बोलण्यामुळे आता खेडेकर यांचा भाजप अपमान करत असल्याची चर्चा तळकोकणात सुरू झाली आहे. याच चर्चेदरम्यान खेडेकर यांनी पुन्हा एकदा भाजप प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांची भेट घेतली आहे. तसेच त्यांनी दरेकर यांचीही भेट घेतल्याचे समोर आले आहे. या भेटीनंतर आता खेडेकर यांची मानसिक चलबिचल वाढल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.
खेडेकर यांनी भाजपने पक्ष प्रवेश रोखला असतानाही भाजपचे काम सुरू केले आहे. तसेच त्यांनी भाजपने न बोलावताच स्वत:हूनच मुंबईत जावून भाजप नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. आज बुधवारी त्यांनी चव्हाण आणि दरेकर यांची भेट घेतली. या भेटीगाठींचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
मात्र खेडेकर यांचा पक्ष प्रवेश नेमका कधी होणार? यावर अद्याप प्रश्नचिन्ह कायम आहे. याच पक्षप्रवेशासाठी खेडेकर भाजप नेत्यांच्या कार्यालयांचे उंबरठे झिजवत आहेत अशी चर्चाही आता तळकोकणात सुरू झाली आहे. तर 'राज'कृपेचा वरदहस्त दूर झाल्याने खेडेकर यांची अवस्था बिकट झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
प्र.1: वैभव खेडेकर यांचा भाजप प्रवेश कितव्यांदा रखडला आहे?
👉 तिसऱ्यांदा त्यांचा भाजप प्रवेश रखडला आहे.
प्र.2: वैभव खेडेकर यांनी कोणत्या नेत्यांची भेट घेतली?
👉 भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि आमदार प्रवीण दरेकर यांची भेट घेतली.
प्र.3: ‘राज’कृपेचा उल्लेख या बातमीत का केला आहे?
👉 कारण पूर्वी खेडेकर हे मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याशी जवळीक असलेले मानले जात होते.
प्र.4: या भेटींनंतर अधिकृत भाजप प्रवेश जाहीर झाला आहे का?
👉 नाही, अद्याप अधिकृत प्रवेशाची घोषणा झालेली नाही.
प्र.5: खेडमधील राजकीय स्थिती सध्या कशी आहे?
👉 वैभव खेडेकर यांच्या प्रवेशावरील अनिश्चिततेमुळे खेडमध्ये राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.