Nilesh Rane- Bhaskar Jadhav Sarkarnama
कोकण

भास्कर जाधव औकातीत राहा; राणेंच्या नादाला लागू नका : नीलेश राणेंचा हल्लाबोल

आमदार भास्कर जाधव यांना उद्धव ठाकरेंबद्दल अजिबात प्रेम नाही.

सरकारनामा ब्यूरो

सिंधुदुर्ग : आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांना उद्धव ठाकरेंबद्दल (Uddhav Thackeray) अजिबात प्रेम नाही. त्यांना आपल्या वडिलांबद्दल प्रेम नाही. त्यांनी शिवसेनाप्रमुख (स्व.) बाळासाहेब ठाकरे (Balasaheb thackeray) यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते, आदित्य ठाकरेंची नक्कल केली होती, तेच भास्कर जाधव आज मातोश्रीची भांडी घासत आहेत. त्यामुळे भास्कर जाधव औकातीत राहा, राणेंच्या नादाला लागू नका, असे आव्हान माजी खासदार नीलेश राणे (Nilesh Rane) यांनी आमदार भास्कर जाधव यांना दिले. (Former MP Nilesh Rane criticizes Bhaskar Jadhav)

सिंधुदुर्ग येथील एका कार्यक्रमात माजी खासदार राणे बोलत होते. त्यावेळी त्यांनी शिवसेना उपनेते भास्कर जाधव यांच्यावर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, भास्कर जाधव हे मंदिरात शिव्या देतात. सुप्रिया सुळे यांनी युवती मेळावा आयोजित केला होता. त्यात हे नाचत होते. त्यावेळी त्यांना मागे जायला सांगितले होते.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सावर्डे येथे २००९ मध्ये प्रचारसभा होती. व्यासपीठावर भास्कर जाधव होते. अजित पवार जिल्ह्यात होते, मात्र ते कार्यक्रमाला आले नव्हते. ती आघाडीची प्रचारसभा होती. भास्कर जाधव भाषणाला उभे राहिले. त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरले. बाळासाहेब किती दिवस जगणार आहेत, त्यामुळे शिवसेनेला मते देऊ नका, असे सांगणारे भास्कर जाधव आज मातोश्रीची भांडी घासत आहेत. आदित्य ठाकरे यांचीही त्यांनी नक्कल केली होती, असे नीलेश राणे यांनी सांगितले.

राणे म्हणाले की, भास्कर जाधव यांचे सख्खे चुलतभाऊ बाळशेठ जाधव व त्यांच्या मुलावर हल्ला झाला हेाता. त्यांना ठार मारणार होते, मात्र आम्ही त्यांचा जीव वाचवला. आम्ही जर वेळेत पोचलो नसतो तर ते मेले असते. विकास कामांवर बोलणारे विनायक मुकादम यांना दुसऱ्या मजल्यावरून फेकून देण्यात आले होते.

कोरोना काळात भास्कर जाधव हे दवाखान्यात पाहणी करायला गेले, तेव्हा डॉक्टर म्हणाले, साहेब रेमडेसिव्हिर, ऑक्सिजनची टंचाई आहे. (नीलेश राणे यांनी भास्कर जाधवांची नक्कल केली) त्यांना रेमडेसिव्हिर बोलता येत नाही आणि दुसऱ्यांची नक्कल करता. राणेंना बघून भास्कर जाधवांचं ऑक्सीजन कमी होते, ते मोजण्याचे यंत्र म्हणजे ऑक्सिमीटर. भास्कर जाधव औकतीत राहा. तुमची औकात आम्हाला शिकवू नका. ती आम्हाला माहिती आहे. भास्कर जाधव, विनायक राऊत यांना अशाच पद्धतीने बोलण्यासाठी सोडलेले आहे. त्यांचा पक्षाला दुसरा काहीही उपयोग नाही, असेही राणे यांनी नमूद केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT