Narayan Rane, Rajan Salvi sarkarnama
कोकण

Narayan Rane News : राजन साळवी यांनी नारायण राणेंना डिवचलं; तर आमचा विजय निश्चित...

Rajan Salvi आतापर्यंतचा इतिहास पाहिला नारायण राणे यांना शिवसेना या चार शब्दामुळे ते मोठे झाले आहेत असेही राजन साळवी म्हणाले.

सरकारनामा ब्युरो

Ratnagiri News : सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात नारायण राणे यांचे नाव चर्चेत आहे. आता या उमेदवारीवरून ठाकरे गटाचे उपनेते आमदार राजन साळवी यांनी भाष्य केल आहे.नारायण राणे जर का या वेळेला उमेदवार असतील तर ही निवडणूक आमच्यासाठी सोपी आहे, असं मोठे विधान करत राजन साळवी यांनी नारायण राणे यांना डिवचले आहे.

राजन साळवी म्हणाले, लोकसभा निवडणुकांसाठी आता काही दिवसात आचारसंहिता लागेल. त्यानंतर निवडणुकांची तयारी सुरू होईल आणि या कोकणाला आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला ही निवडणूक काही नवीन नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने कोकण व शिवसेना हे वेगळं नातं आहे.

आतापर्यंतचा इतिहास पाहिला नारायण राणे यांना कोणी मोठे केलं, चार शब्द शिवसेना यामुळे ते मोठे झाले आणि मागच्या निवडणुकीचा इतिहास पाहिला तर वैभव नाईक सारख्या तरुणाने त्यांना निवडणुकीत पराभूत केलं. एका महिलेने मुंबई महानगरात पराभूत केलं, असा टोला राजन साळवी यांनी लगावला.

त्यामुळे नारायण राणे हे लोकसभेसाठी उमेदवार असतील तर आमचा विजय नक्की आहे. आम्ही चांगल्या फरकांनी विजयी होवू, हा आम्हाला विश्वास आहे. नाराय़ण राणे (Narayan Rane) यांनी लोकसभा निवडणुकीसाठी उभे रहावेच, असे आव्हान देऊन साळवी म्हणाले, नाराय़ण राणेंचा विनायक राऊत नक्की पराभव करणार, तिसऱ्यांदा हॅटट्रीक साधणार, असे त्यांनी स्पष्ट केले.

राजन साळवी म्हणाले, नारायण राणे उमेदवार असतील तर ही निवडणूक आम्हाला सोपी आहे. नारायण  राणे किंवा अन्य कोणी असू दे, कोकणावर वर्चस्व फक्त उद्धव ठाकरेंच्या  शिवसेनेचेच आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Edited By : Umesh Bambare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT