मुंबई - शिवसेना प्रमुख आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात बाळासाहेबांची प्रति छबी दिसून आली. बाळासाहेब ठाकरे यांच्या हातातल्या रुद्राक्षाच्या माळा कायम सोबत असायच्या. आता उद्धव ठाकरेंच्या हातात देखील रुद्राक्षाची माळ दिसायला लागली आहे. Similarity Between Shivsena Chief Late Balasaheb Thackeray and Uddhav Thackeray Rudraksha Mala
उद्धव ठाकरेंनी मनगटी बांधल्या रुद्राक्ष माळा
अयोध्येत राम मंदिरात श्रीरामाची प्राण प्रतिष्ठा झाल्यावर त्याच संध्याकाळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे Uddhav Thackeray यांनी सहकुटुंब आणि नेत्यांसह नाशिकच्या काळाराम मंदिरात पूजा केली. यावेळी रश्मी ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंच्या हातात रुद्राक्षची माळ बांधली. ती माळ अजूनही उद्धव ठाकरे यांच्या हातात आहे.
उद्धव ठाकरेंच्या गळ्यातील आणि हातातील रूद्राक्ष माळेने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. बाळासाहेब ठाकरे Balasaheb Thackeray यांनी त्यांच्या हातात आयुष्यभर रूद्राक्षाची माळ कायम जपली. तीच परंपरा पुढे घेऊन उद्धव ठाकरे पुढील प्रवास करणार का असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
बाळासाहेब ठाकरे यांचा पेहराव सगळ्यांना ज्ञात आहे. बाळासाहेब ठाकरे कायम कुर्ता, पायजमा आणि अंगावर शाल परिधान करून असायचे. त्यांचसोबत त्यांच्या गळ्यात आणि हातात रुद्राक्षांची माळ असायची. बाळासाहेबांचा हा पेहराव अनेकांनी स्पर्धेत भाग घेताना देखील केला. त्यांच्या हातात रुद्राक्षाची माळ ही कायम असायची आणि ती एका विशिष्ट पद्धतीने घातलेली असायची. त्यांच्या या रुबाबदार पेहरावाचे अनेक फॅन होते हे म्हणणं गैर राहणार नाही.
तशीच छबी आता त्यांचे पुत्र उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यात दिसून येत आहे. भाषण करताना उद्धव ठाकरे देखिल कुर्ता, पायजमा, घालून येतात. मात्र आता त्यात बाळासाहेब ठाकरे यांच्या सारख्या रुद्राक्षांच्या माळांचा देखील समावेश झाला आहे.
हे देखिल वाचा-
उद्धव ठाकरे यांनी जो पेहराव नशिक Nashik मध्ये केला होता आणि हातातल्या रुद्राक्षांच्या माळेवरून शिंदे गटातील नेत्यांनी त्यांच्यावर टीका देखील केली. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील त्याच्यावर भाष्य केलं. भगवे वस्त्र आणि रुद्राक्ष माळा घालून कोणालाही बाळासाहेब होता येणार नाही. त्यासाठी बाळासाहेबांसारखे धगधगते विचार असावे लागतात. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार अंमलात आणण्यासाठी वाघाचं काळीज लागतं. काँग्रेसच्या ताटाखालचं मांजर होऊन, सत्तेसाठी सर्वात मोठा कोणी मिंधेपणा केला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.