Uday Samant, Swarupa Samant
Uday Samant, Swarupa Samant sarkarnama
कोकण

Uday Samant : मला भीती वाटते... त्याने संभाळून राहावे : उदय सामंतांना आईचा सल्ला

Umesh Bambare-Patil

रत्नागिरी : शिंदेंच्या मंत्रिमंडळात उदय सामंत यांना मंत्रीपद मिळाल्याबद्दल त्यांचे वडील अण्णा व आई स्वरूपा सामंत यांना आनंद झाला असून त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. जनतेच्या कामासंदर्भात राजकारण जरा संभाळून करणे गरजेचे आहे. चार दिवसांपूर्वी त्यांच्यावर झालेला हल्ला पाहता मला राजकारणाचीच भीती वाटते. त्याने संभाळून राहावे, असा सल्ला आई स्वरूपा सामंत यांनी दिला आहे. जनतेवर असलेल्या प्रेमातून आपले कार्य पुढे चालू ठेऊन रत्नागिरी जिल्ह्याचा विकास करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज झाला. नवीन मंत्र्यांच्या शपथविधीचा सोहळा मंत्री उदय सामंत यांचे आई स्वरूपा सामंत व वडील रविंद्र सामंत (आण्णा) हे टिव्हीवरून पहात होते. स्वतःच्या मुलाचा मंत्रिपदाचा शपथविधी पाहून सामंत यांच्या आई- वडीलांच्या नेमक्या भावना एका वृत्तवाहिनीने जाणून घेतल्या.

सामंत यांची आई स्वरूपा सामंत म्हणाल्या, त्याला मंत्रीपद मिळाल्याचे समाधान आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी काहीतरी मंत्रीपद असणे गरजेचे आहे. जनतेच्या कामासंदर्भात राजकारण करत असताना संभाळून काम करणे गरजेचे झाले आहे. चार दिवसांपूर्वी त्याच्यावर झालेला हल्ला पाहता मला राजकारणाचीच भीती वाटते. त्याने संभाळून राहावे. जनतेवर असलेले प्रेमातून त्याचे कार्य पुढे चालू राहावे. रत्नागिरी जिल्ह्याचा विकास करावा.

वडील रवींद्र (अण्णा) सामंत म्हणाले, आम्हाला आनंद झालेला आहे. त्याने यापूर्वी अनेकदा मंत्रीपदे भोगलेली आहेत. त्यांच्यातील चांगूलपणामुळे हे पद त्याला मिळालेले आहे. माझ्या दोन्ही मुलांपैकी उदयला राजकारणात आणि किरण हा व्यवसायात आहे. उदय सामंत राजकारणात कसे आले याविषयी सांगताना रवींद्र सामंत म्हणाले, १९९८ मध्ये त्याने राजकारणात पाय ठेवला.

कॉलेजमध्ये जीएस होता. त्यावेळी प्रत्येक गोष्ट पुढाकाराने तो करत होता. बोलण्याची कला त्याला अवगत आहे. आमचे मित्र हसनकर हे काँग्रेसचे नेते होते. त्यांनी त्याला काँग्रेस पक्षात काम करण्याची संधी दिली. राजकारण करताना गोरगरीबांपर्यंत पोहोचून त्यांच्या गरजा ओळखून काम करावे, असे त्याला मी सांगितले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT