Ramdas Kadam Shrikant Shinde sarkarnama
कोकण

Ramdas Kadam News : '…तर मी निवृत्त होईन', श्रीकांत शिंदेंच्या मदतीला रामदास कदम धावले

Roshan More

Loksabha Election 2024 : कल्याणमधून ठाकरे गटाने वैशाली दरेकर यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र, अजुनही कल्याणचे विद्यमान खासदार, मुख्यमंत्री यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर झालेली नाही. त्यामुळे शिंदे गटाला डिवचण्याची एकही संधी ठाकरे गट सोडत नाहीत. मुख्यमंत्री स्वतःच्या मुलाचीच उमेदवारी जाहीर करू शकत नाहीत, असे म्हणत ठाकरे गटाचे नेते वरूण सरदेसाई यांनी श्रीकांत शिंदे यांची खिल्ली उडवली होती. खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी देखील याच मुद्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली होती. या टीकेला शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.

मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटलो. आमच्यात दोन तास चर्चा झाली. महायुतीत जागावाटप आणि तिकीट वाटपात कोणतीही अडचण नाही. एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) मुलाला तिकीट मिळालं नाही तर मी राजकारणातून निवृत्त होईन, असे रामदास कदम (Ramdas Kadam ) यांनी जाहीर केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कल्याणमध्ये वरुण सरदेसाई यांनी श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका केली होती. शिंदे गटातील उमेदवारी घोषित होऊन परत रद्द केल्या जात आहेत. ज्या खासदारांच्या मतदारसंघात नकारात्मक वातावरण आहे, त्याचे हे परिणाम आहेत. अशीच परिस्थिती श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण मतदारसंघात त्यामुळे श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी घोषित केली जात नाही, असा टोला सरदेसाई यांनी लगावला.

श्रीकांत शिंदेंच टेन्शन वाढलं

कल्याण मतदारसंघातून श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाली तर एकही भाजप कार्यकर्ता त्यांचे काम करणार नसल्याची भूमिका भाजप कार्यकर्त्यांनी घेतली आहे. आमदार गणपत गायकवाड यांच्या समर्थकांनी बैठक घेत आपली भूमिका जाहीर केली. त्यामुळे श्रीकांत शिंदे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT