Kalyan News : कल्याण लोकसभा जागेच्या दाव्यावरुन भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनामध्ये धुसफूस झाल्याचे वृत्त यापूर्वीही माध्यमातून झळकले होते. आताही भाजपच्या स्थानिक नेते, पदाधिकारी यांनी कल्याणच्या दाव्यावरुन आक्रमक पवित्रा घेतला आहे. एकीकडे शिवसेना शिंदे गटाने कल्याणसाठी आपली ताकद लावली आहे. तर दुसरीकडे कोणत्याही परिस्थितीत कल्याणची जागा शिवसेनेला सोडायची नाही, अशी आक्रमक भूमिका स्थानिक भाजपचे नेते आणि पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. यामुळे महायुतील हा वाद पुन्हा एकदा समोर आला असून, आता कल्याणच्या दाव्यावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये पुन्हा एकदा जोरदार खडाजंगी होण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)
भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्या कार्यालयात भाजपचे स्थानिक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते, तसेच आमदार गायकवाड यांच्या समर्थकांची एक बैठक पार पडली. जर कल्याणमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदेंना उमेदवारी दिली गेली तर भाजपचा एकही कार्यकर्ता त्यांच्यासाठी काम करणार नसल्याची आक्रमक भूमिका यावेळी घेण्यात आली. शिंदे उमेदवार असल्यास काम करणार नसल्याचा ठराव देखील भाजच्या कार्यकत्यांनी संमत केल्याची सूत्रांची माहिती दिली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
कल्याण लोकसभेची जागा भाजपाला मिळाले पाहिजे, अशी आग्रही मागणी स्थानिक भाजप नेते व पदाधिकारी वरिष्ठांकडे करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. जर ही जागा भाजपला मिळाली नाही तर महायुतीचे काम करणार नाही, असेही वरिष्ठांना कळवण्यात येणार आहे. अशा मागणीचं सह्या केलेले एक निवेदनही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनुळे यांना सादर करण्यात येणार आहे. यामुळे विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे (Shreekant Shinde) यांच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांची नाराजी कायम ठेवली आहे, असे चित्र दिसून येत आहे.
कल्याण लोकसभेची (Lok Sabha) जागा भाजपला मिळावी या करता कल्याण पूर्वेत ही भाजप कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. लोकसभेची जागा भाजपलाच मिळावी यासाठी पदाधिकाऱ्यांची निर्णय आणि चर्चा झाल्याची जोरदार चर्चा आहे. याआधी शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांचे फोटो बॅनर न लावण्याचा निर्णय कल्याण पूर्वेतील भाजप पदाधिकारी यांनी घेतला होता. पुन्हा एकदा हा वाद उफाळून आला आहे.