Ramdas Kadam News : 'ठाकरेंना खोके देऊ शकले नाहीत म्हणून वायकर...' ; कदमांचे खळबळजनक आरोप!

Uddhav Thackeray News : "वायकराचं दुसरं नाव मातोश्री कॅबिनेट किचन..."
Ramdas Kadam News
Ramdas Kadam News Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : शिवसेना ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. मागील अनेक दिवसांपासून वायकर हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती. सायंकाळी आठच्या दरम्यान ते वर्षा निवासस्थानी दाखल होऊन शिवसेनेत प्रवेश करू शकतात, अशी चर्चा आहे. दरम्यान यासंदर्भात बोलताना शिंदे गटाचे आमदार रामदास कदम यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर अत्यंत खळबळजनक आरोप केले आहेत. (Latets Marathi News)

शिंदे गटाचे रामदास कदम यांनी आमदार रवींद्र वायकर यांचं अभिनंदन केले आहे. तसेच त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. वायकरांकडे ठाकरेंनी खोक्यांची मागणी केल्याचा गंभीर आरोप वायकरांनी केला. तसेच वायकर ठाकरेंना 'खोके' देऊ शकले नाहीत, त्यामुळे ते आजपर्यंत मंत्री बनू शकले नाही, असा आरोप कदम यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कदम म्हणाले, "मला वाटतं वायकराचं दुसरं नाव मातोश्री कॅबिनेट किचन असं आम्ही त्यांना म्हणायचो. वायकरांना मंत्रिपद का दिलं नाही. कुठे कमी पडले वायकर? ते मला एकदा खासगीमध्ये म्हणाले, 'माझ्याकडे उद्धव ठाकरेंनी खोक्यांची मागणी केली होती. पण मी ते देऊ शकलो नाही. म्हणून मला मंत्रिपद दिलं नाही."

"शिवसेना भवन (Shiv Sena) जे उभं केलं गेलं त्यात वायकरांचा सिंहाचा वाटा आहे. अशा माणसाला मातोश्रीसोडून का जावं लागतं. आज ते शिवसेनेत दाखल होत आहेत. त्यांचं अभिनंदन, असेही रामदास कदम (Ramdas Kadam) म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com