karjat land dispute case sarkarnama
कोकण

Shivsena News : जमिनीच्या वादातून राजकारण तापले : शिंदेंच्या आमदाराच्या भाच्याच नाव समोर; परस्पर गुन्हे दाखल

karjat land dispute case : कर्जत तालुक्यात जमिनीच्या वादातून परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले असून या प्रकरणात आमदार थोरवे यांच्या भाच्याचे नाव समोर आले आहे. यामुळे कोकणातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे.

सरकारनामा ब्युरो

  1. कर्जत तालुक्यातील हालिवली गावात जमिनीच्या वादातून दोन गटांमध्ये मारहाण झाली असून परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.

  2. या प्रकरणात शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांचे भाचे संकेत भासे यांचे नाव समोर आल्याने राजकीय चर्चा सुरू झाली आहे.

  3. कर्जत पोलीस दोन्ही बाजूंच्या तक्रारींची चौकशी करत असून पुरावे आणि वैद्यकीय अहवालांच्या आधारे पुढील कारवाई करणार आहेत.

Raigad Crime News : कैलास म्हामले

कर्जत तालुक्यातील हालिवली गावात मंगळवारी (ता.१२) जमिनीच्या वादातून दोन गटांमध्ये झालेल्या मारहाणीप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांचे भाचे संकेत भासे यांचे नाव समोर आले आहे. यामुळे तालुक्यात या घटनेची मोठी चर्चा सुरू आहे.

आमदार महेंद थोरवे यांचे भाचे नगरसेवक संकेत भासे यांनी हलवली येथील रमेश बोराडे यांच्या भगिनींच्या हिस्यातील जमीन खरेदी करून त्या ठिकाणी भरावा आणि कंपाऊंडचे काम स्थानिक तरुण ओंकार हंडे यांच्या मार्फत सुरू केले.

मात्र आकार फोड न झाल्याने सीमा आणि क्षेत्र याबाबत अनिश्चतता असल्याने दोन्ही गटाकडून मागील काही दिवस वाद सुरू होता. मंगळवारी संकेत भासे त्या ठिकाणी येऊन आम्हाला दमदाटी आणि मारहाण केल्याचं आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. यामध्ये आमदार थोरवे यांचे भाचे असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

हालिवली येथील शेतकरी भूषण रमेश बोराडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, देऊळवाडी परिसरातील एचपी पेट्रोल पंपासमोरील वादग्रस्त जागेवर १२ मे रोजी दुपारी संकेत भासे, ओमकार हांडे आणि अन्य काही जण आले. त्यांनी भूषण बोराडे, त्यांचे वडील रमेश बोराडे आणि भाऊ ऋषीराज बोराडे यांना मारहाण केली.

ओमकार हांडे यांनी लोखंडी रॉडने डोक्यावर वार केल्याचा आरोप असून, संकेत भासे यांनी बंदुकीची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. जखमींवर एमजी एम कामोठे रुग्णालयात उपचार सुरू आहे.

या घटनेनंतर ओमकार हांडे यांनीही प्रतितक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, संबंधित जागेवर सुरू असलेले काम भूषण बोराडे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी थांबवून त्यांच्यावर हल्ला केला. दगडफेक करून वाहनांच्या काचा फोडल्याचा आणि नुकसान केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, संबंधित जमीन हिस्सेदारांची असून तिची विभागणी अद्याप झालेली नाही. याच कारणावरून दोन्ही पक्षांमध्ये दीर्घकाळ वाद सुरू असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणात लोकप्रतिनिधींच्या नातेवाईकाचे नाव समोर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. कर्जत पोलीस दोन्ही बाजूंच्या तक्रारींची चौकशी करत असून, वैद्यकीय अहवाल आणि पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

FAQs :

1. ही घटना कुठे घडली?

कर्जत तालुक्यातील हालिवली गावात ही घटना घडली.

2. वादाचे कारण काय होते?

जमिनीच्या वादातून दोन गटांमध्ये मारहाण झाली असल्याची माहिती आहे.

3. या प्रकरणात कोणाचे नाव चर्चेत आहे?

शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांचे भाचे संकेत भासे यांचे नाव चर्चेत आले आहे.

4. पोलिसांनी काय कारवाई केली आहे?

कर्जत पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

5. पुढील तपास कशाच्या आधारे होणार आहे?

वैद्यकीय अहवाल आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई करण्यात येणार आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT