Shinde Shivsena BJP alliance controversy : ज्या उमेदवारासाठी युतीची तडजोड तोच पराभूत, भाजपने राखली शिंदे सेनेची लाज

Ashish Jaiswal allegation Politics : नागपूरमध्ये भाजपसोबत शिंदेंच्या शिवसेनेनं युती केली. पण या युतीविरोधात मोठा असंतोष उफाळून आला होता.
Ashish Jaiswal
Ashish Jaiswalsarkarnama
Published on
Updated on
Summary
  • भाजपसोबत केवळ आठ जागांवर युती केल्यामुळे शिंदे सेनेत तीव्र असंतोष निर्माण झाला होता.

  • अर्थराज्य मंत्री आशिष जयस्वाल यांनी एका समर्थकासाठी युती केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला होता.

  • ज्या उमेदवारासाठी तडजोड झाल्याचा आरोप होता, त्याच उमेदवाराचा निवडणुकीत धक्कादायक पराभव झाला.

Nagpur News : भाजपसोबत फक्त आठ जागेवर युती केल्याने शिंदे सेनेत मोठा असंतोष उफाळून आला होता. एवढचे नव्हे तर सहा जागेवर भाजपचे आपले उमेदवार लादले होते. त्यामुळे शिवसैनिकांनी युती कशाला केली असा सवाल नेत्यांना केला होता. अर्थराज्य मंत्री आशिष जयस्वाल यांनी फक्त आपल्या एकमेव समर्थकासाठी युती केल्याचा आरोपही शिवसैनिकांनी केला होता.

मात्र ज्या उमेदवारासाठी जयस्वालांनी तडजोड केल्याचा आरोप आहे त्या उमेदवाराचा धक्कादायक पराभव झाला आहे. धनुष्यबाणाला कमळाची साथ लाभल्यानंतरही कोमल तळवेकर यांच्या पदरात विजय पडला नाही. धनुष्यबाणावर लढलेले भाजपचे गणेश चर्लेवार यांनी शिंदे सेनेला अधिकृत खाते उघडून पक्षाची लाज राखली.

प्रभाग क्रमांक तीनमधून कोमल तळवेकर या भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवार होत्या. माजी नगरसेवक बंडू तळवेकर यांच्या त्या कन्या आहेत. तळवेकर आशिष जयस्वाल यांचे कट्टर समर्थक आहेत. शिवसेनेच्यावतीने युतीमध्ये २० जागेची मागणी केली होती. उमेदवारी दाखल करायच्या शेवटच्या दिवसापर्यंत भाजपासोबत जागा वाटपासाठी बोलणी सुरू होती.

Ashish Jaiswal
BJP Shivsena alliance : 9 बैठकांनंतरही भाजप नेत्यांचा रिप्लायच नाही, म्हणून युती तुटली : अतुल सावे, संजय केनेकरांच्या वागण्यावर शिरसाट फाडफाड बोलले...

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या घरी झालेल्या बैठकीत शेवटी ८ जागा शिवसेनेसाठी सोडण्याचा निर्णय झाला. त्यापैकी ६ जागेवर भाजपचे उमेदवार राहतील असेही शिवसेनेला सांगण्यात आले होते. या युतीवर शिवसेनेचा एकही नेता समाधानी नव्हता. त्यापेक्षा स्वतंत्र लढणे योग्य राहील असेही त्यांचे म्हणणे होते.

मात्र भाजपने कोणाचेच ऐकले नाही. शेवटी शिवसेनेचे आमदार कृपाल तुमाने, पूर्व व विदर्भाचे संघटक किरण पांडव हे बैठक सोडून निघून गेले. त्यामुळे युती तुटल्याची अफवा पसरली होती. मात्र अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी बैठक सोडली नाही. त्यांनी भाजपच्या सर्व अटी मान्य केल्या.

दोन जागेवर शिवसेनेचे तर उर्वरित सहा जागेवर भाजपचे उमेदवार धनुष्यबाणावर लढतील असेही त्यांनी मान्य केले. या युतीवरून शिवसैनिकांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली होती. भाजपचे शिवसेनेसाठी प्रभाग क्रमांक ८ मध्ये कृतिका गोन्नाडे, प्रभाग २४ मधील दुरेश्वरी कोसारे, प्रभाग पाचमध्ये योगेश गोन्नाडे, प्रभाग क्रमांक ३१ गणेश चर्लेवार, प्रभाग ३०मध्ये स्नेहल बिहारे, प्रभाग ९मध्ये प्रतिभा चवरे आणि प्रभाग क्रमांक ७ मध्ये मीना तरारे यांना उमेदवारी देण्यात आली होती.

Ashish Jaiswal
BJP ShivSena NCP alliance : बहुमतासाठी फक्त आठ आमदार कमी... तरी शिवसेना-राष्ट्रवादीचं ओझं भाजप का वागवतीय? फडणवीस यांची मजबुरी तरी काय?

FAQs :

1. शिंदेसेनेत असंतोष का निर्माण झाला?
भाजपसोबत फक्त आठ जागांवर युती करून सहा ठिकाणी भाजपचे उमेदवार लादल्यामुळे असंतोष निर्माण झाला.

2. आशिष जयस्वाल यांच्यावर नेमका काय आरोप होता?
त्यांनी केवळ आपल्या एकमेव समर्थकासाठी युती केली, असा आरोप शिवसैनिकांनी केला होता.

3. भाजपने किती ठिकाणी आपले उमेदवार दिले होते?
एकूण सहा जागांवर भाजपचे उमेदवार लादण्यात आले होते.

4. ज्या उमेदवारासाठी तडजोड झाली त्याचा निकाल काय लागला?
त्या उमेदवाराचा निवडणुकीत धक्कादायक पराभव झाला.

5. या पराभवाचा शिंदेसेनेवर काय परिणाम होऊ शकतो?
यामुळे पक्षातील अंतर्गत नाराजी वाढण्याची आणि भविष्यातील युतींवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com