Navi Mumbai SIR Enumeration Form Controversy in Kharghar : नवी मुंबईतील खारघर सेक्टर 19 येथील एका झेरॉक्स सेंटरमध्ये SIR (Special Intensive Revision) अंतर्गत भरलेल्या Enumeration Formच्या प्रती काढल्या जात असल्याच्या मुद्द्यावरून भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार वाद झाला.
या प्रकरणात नायब तहसीलदार सुनील जाधव यांच्या जबाबावरून सुरज पाटील याच्याविरोधात संबंधित कायद्यांतील कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खारघर सेक्टर 19 मधील एका झेरॉक्स दुकानात SIR प्रक्रियेसाठी भरलेल्या मोठ्या संख्येने Enumeration Formच्या प्रती काढल्या जात असल्याची माहिती शिवसेना ठाकरे पक्षाच्या (Shivsena UBT) पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मिळाली. झेरॉक्स काढणारी व्यक्ती भाजपचा युवा कार्यकर्ता असल्याचा दावा करण्यात आल्यानंतर शिवसेना ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते दुकानात दाखल झाले.
SIR प्रक्रियेशी संबंधित फॉर्म भाजपच्या (BJP) पदाधिकाऱ्यांकडे कसे आले, असा सवाल शिवसेना ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला. यावरून दुकानात दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. परिस्थिती चिघळल्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप केला. दरम्यान, प्रकरण पोलिस ठाण्यात जाणार असल्याचे लक्षात येताच झेरॉक्स काढण्यासाठी आलेली व्यक्ती तेथून निघून गेल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर शिवसेना ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. महसूल विभागाचे अधिकारीही पोलिस ठाण्यात दाखल झाले.
नायब तहसीलदार सुनील जाधव यांनी पोलिसांकडे जमा असलेल्या SIR फॉर्मची प्राथमिक तपासणी केली. या तपासणीत काही फॉर्मवर मतदारांचे रंगीत फोटो, संबंधित BLOच्या स्वाक्षऱ्या तसेच आवश्यक माहिती भरलेली असल्याचे प्रथमदर्शनी आढळून आल्याचे सांगण्यात आले. या प्राथमिक तपासणीनंतर संबंधित फॉर्म निवडणूक विभागाच्या प्रक्रियेशी संबंधित असल्याचे स्पष्ट झाल्याचे महसूल विभागाकडून सांगण्यात आले. त्यानंतर सुरज पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, दाखल करण्यात आलेला गुन्हा किरकोळ स्वरूपाचा असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. नगरसेविका लीना गरड यांनी SIR प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित करत सत्ताधाऱ्यांवर टीका केली. "17 तासांच्या तीव्र आंदोलनानंतर पोलिसांनी FIR दाखल केली खरी; मात्र ही अत्यंत किरकोळ FIR आहे," असा दावा लीना गरड यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.