BMC Tender Contractor Attack : BMC कंत्राटावरून रक्तरंजित संघर्ष! कंत्राटदारावर चाकूहल्ला; 'स्वसंरक्षणात मीही वार केला', परस्परविरोधी तक्रारी

BMC tender clash in Mumbai: एफ-नॉर्थ विभागातील निविदेच्या वादातून हल्ल्याचा आरोप; चार अज्ञातांविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा, जखमी तरुणाचीही स्वतंत्र तक्रार, CCTVच्या आधारे तपास सुरू.
BMC Tender Dispute Turns Violent Contractors File Cross Cases
BMC Tender Dispute Turns Violent Contractors File Cross CasesSarkarnama
Published on
Updated on

BMC F North Ward incident: मुंबई महापालिकेच्या एफ-नॉर्थ विभागातील एका कंत्राटावरून सोमवारी झालेल्या वादाचे हिंसक रूपांतर झाले. कंत्राटदारावर चाकूहल्ला झाल्यानंतर त्यानेही स्वसंरक्षणाच्या नावाखाली एका तरुणावर चाकूने वार केल्याचा दावा केला आहे. या प्रकरणात माटुंगा पोलिस ठाण्यात दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या असून पोलिसांनी चार अनोळखी व्यक्तींविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवला आहे.

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, भाईंदर येथील खासगी कंत्राटदार भैरू पदम सिंग (वय 43) यांनी एफ-नॉर्थ विभागातील झोपडपट्टी परिसरातील लादीकामाच्या निविदेसाठी अर्ज केला होता. रविवारी एका अनोळखी व्यक्तीने फोन करून त्यांना ही निविदा मागे घेण्याची धमकी दिल्याचा आरोप सिंग यांनी केला आहे.

या धमकीबाबत चौकशी करण्यासाठी सिंग सोमवारी मुंबई महापालिकेच्या (BMC) एफ-नॉर्थ विभागाच्या कार्यालयात गेले. त्यावेळी कार्यालयाच्या मागील प्रवेशद्वाराजवळ चार जणांनी त्यांना अडवून चाकूने पोटावर वार केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच एका हल्लेखोराने बिअरची बाटली फोडून त्यांच्या हातावर गंभीर दुखापत केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

BMC Tender Dispute Turns Violent Contractors File Cross Cases
Delhi Police FIR : विद्यार्थी आंदोलकांवर खुनाच्या प्रयत्नासह 13 कलमांखाली गुन्हा; लांबा-शर्मा निलंबनासाठी 'कॉक्रोच'चा अल्टिमेटम

हल्ल्यानंतर माटुंगा पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत भैरू सिंग यांनी धमकी मिळाल्यामुळे स्वसंरक्षणासाठी घरातून चाकू सोबत आणल्याचे मान्य केले आहे. हल्लेखोर पळून जात असताना त्याचा पाठलाग केला. धावताना तो पाय घसरून पडल्याने स्वतःजवळील चाकूने त्याच्या पायावर वार केल्याचा दावा सिंग यांनी केला आहे.

BMC Tender Dispute Turns Violent Contractors File Cross Cases
Cabinet Expansion : काँग्रेसमध्ये मंत्रिमंडळ विस्तारानंतर बंडाचे वारे; बस रोखल्या, टायर जाळले, 19 नगरसेवकांचे राजीनामे

जखमीची वेगळी तक्रार

या घटनेत आशीष संजय यादव हा तरुणही जखमी झाला आहे. त्याने माटुंगा पोलिस ठाण्यात स्वतंत्र तक्रार दाखल केली असून, कार्यालयाबाहेर सुरू असलेले भांडण सोडवण्यासाठी गेलो असता पांढरा शर्ट घातलेल्या व्यक्तीने, म्हणजेच कंत्राटदाराने, आपल्या पायावर चाकूने वार केल्याचा आरोप त्याने केला आहे.

पोलिसांचा तपास सुरू

या प्रकरणात दोन्ही बाजूंच्या तक्रारींची नोंद करण्यात आली असून, घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींची साक्ष आणि जखमींचे वैद्यकीय अहवाल यांच्या आधारे पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. निविदा प्रक्रियेशी संबंधित वादातून हा हल्ला झाला का, याचाही तपास सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com