Khed municipal election, Yogesh Kadam sarkarnama
कोकण

Khed municipal election : खेडमध्ये १४ वर्षांनंतर ऐतिहासिक विजय! योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचा विरोधकांना 21-0 असा क्लीन स्वीप

Mahayuti wins in Yogesh Kadams leadership : खेड पालिकेत तब्बल १४ वर्षांनी सत्ता बदल झाला असून शिवसनेची एकहाती सत्ता आली आहे.

Aslam Shanedivan

  1. खेड पालिकेच्या निवडणुकीत महायुतीने 21-0 असा ऐतिहासिक आणि एकतर्फी विजय मिळवला आहे.

  2. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने सर्व जागांवर निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले.

  3. तब्बल 14 वर्षांनंतर खेड पालिकेत शिवसेनेची एकहाती सत्ता पुन्हा प्रस्थापित झाली आहे.

Ratnagiri News : गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने खेड पालिकेच्या निवडणुकीत २१-० असा ऐतिहासिक व एकतर्फी विजय मिळवत एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे. या निकालात महायुतीने सर्वच्या सर्व जागांवर निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. खेड पालिकेत तब्बल १४ वर्षांनी शिवसनेची एकहाती सत्ता आली आहे.

मतदानानंतर खेडमध्ये कोणाची सत्ता येणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, निकाल जाहीर होताच महायुतीने २१ जागा जिंकत विरोधकांना भूईसपाट केले. या निकालात महाविकास आघाडीला खातेही उघडता आले नाही. ‌या घवघवीत विजयामुळे माधवी राजेश बुटाला या नगराध्यक्षपदी विराजमान होणार आहेत. जनतेने दिलेल्या या स्पष्ट कौलातून विकासाभिमुख नेतृत्वावरचा विश्वास अधोरेखित झाला आहे.

या निवडणुकीत शिवसेनेचे १७ उमेदवार विजयी झाले तर भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले. या निवडणुकीनंतर शिवसैनिकानी खेड पालिकेच्या मैदानात ढोल ताशा, बाजा, हलगी, डीजेच्या तालावर ठेका धरत विजयोत्सव साजरा केला. निकालानंतर खेड शहरातून विजयी रॅली काढण्यात आली.

शिवसेनेला खेड पालिकेत १४ वर्षांनंतर निर्विवाद सत्ता मिळाली आहे. या निवडणुकीत मिळालेले यश येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत मिळणाऱ्या विजयाची नांदी आहे. मतदारांनी टाकलेला विश्वास आम्ही विकासाच्या मार्गाने सार्थ ठरवू.
-योगेश कदम, गृह राज्यमंत्री
आमच्याकडे कोणताही स्टार प्रचारक नाही. तरीही आम्ही सर्व जागांवर उमेदवार उभे करून प्रस्थापित पुढाऱ्‍यांना आव्हान दिले होते. आमच्या प्रत्येक उमेदवाराने चांगले मताधिक्य घेत ठाकरे सेना अद्यापही या ठिकाणी कायम आहे याची विरोधकांना जाणीव करून दिली.
-दत्ता भिलारे, तालुकाप्रमुख, ठाकरे सेना

FAQs :

1. खेड पालिका निवडणुकीत महायुतीने किती जागा जिंकल्या?
महायुतीने सर्वच्या सर्व 21 जागा जिंकल्या.

2. या विजयाचे नेतृत्व कोण करत होते?
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली हा विजय मिळवला.

3. हा विजय ऐतिहासिक का मानला जात आहे?
21-0 असा क्लीन स्वीप मिळवून विरोधकांना एकही जागा न मिळाल्याने हा विजय ऐतिहासिक मानला जात आहे.

4. खेड पालिकेत शिवसेनेची सत्ता किती वर्षांनी आली?
तब्बल 14 वर्षांनंतर शिवसेनेची एकहाती सत्ता आली आहे.

5. या निकालाचा भविष्यातील राजकारणावर काय परिणाम होईल?
या निकालामुळे जिल्हा व राज्य पातळीवर महायुतीची ताकद अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT