Sunil Tatkare Mahendra Thorve controversy; Eknath Shinde sarkarnama
कोकण

Shivsena Crisis : तटकरेंशी हातमिळवणी आमदारासह शिवसेनेच्या अंगलट; थोरवेंना बालेकिल्ल्यातच राष्ट्रवादीचा जोरदार धक्का

Shinde Shivsainiks Join NCP : रायगडमध्ये खोपोलीतील शिवसैनिक मंगेश काळोखे हत्याकांडानंतर आमदार थोरवे यांनी सुनील तटकरे यांना लक्ष्य करत गंभीर आरोप केले होते. मात्र अलीकडेच ते एकाच मंचावर आल्याने हा वाद शमल्याची चर्चा आहे.

Aslam Shanedivan

Raigad News : कोकणातील रायगड जिल्ह्यात महायुतीतील वाद काही केल्या थांबताना दिसत नाहीत. नुकताच पार पडलेल्या विधान परिषदेच्या बिनविरोध निवडीमुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीतील वाद शमल्याची चर्चा आहे. मात्र आता या चर्चा फक्त अफवाच आहे की काय अशी शंका निर्माण होणारी घटना येथे घडली आहे. खोपोलीमध्ये शेकडो शिवसैनिकांनी दिवंगत अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. तर आमदार आमदार थोरवे यांनी खासदार सुनील तटकरेंशी केलेली जवळीक या नाराजीला कारणीभूत असल्याचे आता बोलले जात आहे.

रायगड जिल्ह्यात शिवसेनेचे तीन आमदार, राष्ट्रवादीचा एक आमदार आणि एक खासदार आहे. तर आता विधान परिषदेवर अनिकेत तटकरेंची बिनविरोध निवड झाल्याने राष्ट्रवादीची बार्गेनिंग पॉवर आणखी वाढली आहे. दरम्यान आधी शिवसेनेची ताकद अधिक असल्याने राष्ट्रवादीकडे गेलेले पालकमंत्री पद रद्द करण्यात आले होते. याला आमदार महेंद्र थोरवे आणि आमदार महेंद्र दळवी यांनी केलेला मोठा विरोध होता.

हा विरोध नंतर देखील थोरवे आणि दळवी यांनी कायम ठेवला. खोपोलीतील शिवसैनिक मंगेश काळोखे यांच्या हत्येनंतर तर आमदार थोरवे यांनी थेट तटकरे यांना विलन ठरवले. त्यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांना लक्ष्य केले होते. यानंतर विधान परिषदेच्या निवडणुकांच्या तोंडावर तटकरे यांनी ₹६५ कोटींचा मानहानीचा खटला दाखल थोरवेंच्या विरोधात दाखल करत धक्का दिला. यावेळी तटकरे यांनी थोरवेंच्या गंभीर व निराधार आरोपांमुळे आपली प्रतिमा मलीन झाल्याचे सांगत हा मार्च २०२६ मध्ये माणगाव सत्र न्यायालयात खटला दाखल केला होता.

या खटल्यानंतरच थोरवे यांनी आपल्या विरोधाची तलवार मॅन करत तटकरेंशी मिळते-जुळते घतले. तर सतत विरोध करणारे थोरवेच तटकरेंच्या मुलाचा अर्ज दाखल करताना पुढे हजर होते. यामुळेच शिवसेनेतील कट्टर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली होती. थोरवे आणि तटकरे यांच्यातील वाद हा सर्वश्रुत असताना असे चित्र निर्माण झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. तर काहीच दिवसांच्या आधी तालुका अध्यक्षाने राजीनामा देत आपली नाराजी व्यक्त केली होती.

अद्याप या राजीनाम्याच्या धक्क्यातून शिवसेना सावरत नाही तोच आता पुन्हा एकदा शिवसेनेला तटकरे यांच्याशी आमदार महेंद्र थोरवे यांनी हातमिळवणी केल्याचा फटका बसला आहे. विधान परिषद निवडणुकीत केलेल्या हातमिळवणीनंतर नाराज झालेल्या शेकडो शिवसैनिकांनी खोपोलीमध्येच राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. तर खोपोली हा थोरवे यांचा बालेकिल्ला मानला जातो. हा प्रवेश आमदार थोरवे यांच्यासह शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जात असून राष्ट्रवादीचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT