Shivsena Crisis : राजकारणात खळबळ! शिंदेंना बालेकिल्ल्यातच धक्का? शिवसेनेच्या ९ नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार

Shivsena UBT And MNS petition against Shivsena corporators : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात मालमत्ता, बांधकामे, आर्थिक माहिती तसेच इतर आवश्यक बाबींची संपूर्ण माहिती जाहीर न केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
Shivsena Crisis; Eknath Shinde
Shivsena Crisis; Eknath Shindesarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. दिव्यातील शिंदे गटाच्या नऊ नगरसेवकांविरोधात ठाणे कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.

  2. शपथपत्रात मालमत्ता आणि आर्थिक माहिती अपूर्ण दिल्याचा तसेच बेकायदा मालमत्ता लपवल्याचा आरोप करण्यात आला आहे.

  3. शिवसेना आणि मनसेच्या उमेदवारांनी संबंधित नगरसेवकांना अपात्र ठरवण्याची मागणी केली आहे.

Thane Municipal Politics : नुकताच ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 झाल्या असून येथे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला चांगले यश मिळाले आहे. पण आता दिवा परिसरातून निवडून आलेल्या शिवसेनेच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या नगरसेवकांविरोधात निवडणूक शपथपत्रात कथितरित्या चुकीची जाहीर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत शिवसेना आणि महाराष्ट्र नव निर्माण सेनेनं ठाणे न्यायालयात इलेक्शन रिट पिटीशन दाखल करण्यात आल्याची माहिती ॲड. रोहिदास मुंडे यांनी दिली आहे.

ठाणे महापालिकेच्या झालेल्या निवडणुकीत दिवा विभागातून शिंदेंच्या शिवसेनेचे रमाकांत मदवी, शैलेश पाटील, आदेश भगत, दीपक जाधव, साक्षी मदवी, दर्शना म्हात्रे, अर्चना पाटील, दीपाली भगत आणि स्नेहा पाटील हे नऊ उमेदवार निवडून आले. मात्र या नऊ जणांनी आपल्या शपथपत्रात मालमत्ता तसेच आर्थिक स्थितीची चुकीची माहिती आणि अपूर्ण दिली.

तसेच बेकायदा बांधकामांची व मालमत्तांची माहितीदेखील लपवल्याचा आरोप शिवसेना व मनसेनं केला आहे. याबाबत शिवसेना आणि मनसे या पक्षांच्या उमेदवारांनी न्यायालयात धाव घेत या नगरसेवकांना अपात्र करा, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे.

Shivsena Crisis; Eknath Shinde
Shivsena Crisis : शिवसेना सभापती-गटनेत्याचा शिंदेंच्या आमदारांविरोधात बंड? घरचा आहेर देत सभेवर बहिष्कार; दळवींच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह

विशेषतः लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 मधील कलम 33 अ, कलम 36 तसेच भारतीय न्यायव्यवस्थेने वेळोवेळी दिलेल्या आदेशांनुसार उमेदवाराने सत्य व संपूर्ण माहिती देणे बंधनकारक आहे. खोटी माहिती सादर करणे किंवा तथ्य लपविणे हे मतदारांची दिशाभूल करणारे कृत्य मानले जाते. अशा वेळी शिवसेनेच्या तब्बत नऊ नगरसेवकांना अपत्र ठरविण्याची मागणी करण्यात आली आहे.

या नव्या संकटामुळे शिवसेनेत खळबळ उडाली असून या याचिकांच्या सुनावणीकडे आता सर्वांसह या नऊ नगरसेवकांचे लक्ष लागले आहे. दरम्यान हे प्रकरण निवडणूक आयोगासह आता न्यायप्रविष्ट असल्याचे महापौर शर्मिला गायकवाड यांनी सांगितले आहे.

Shivsena Crisis; Eknath Shinde
shivsena crisis : राजीनामा दिला अन् तडीपारी मिळाली! कोकणात शिंदेंच्या युवा चेहऱ्यावर पोलिसांचा घाव, राजकीय सूडाचा वास?

FAQs :

1. ठाणे कोर्टात कोणाविरोधात याचिका दाखल झाली आहे?

दिव्यातील शिंदे गटाच्या निवडून आलेल्या नऊ नगरसेवकांविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे.

2. नगरसेवकांवर नेमके कोणते आरोप आहेत?

शपथपत्रात मालमत्ता, आर्थिक स्थिती आणि बेकायदा बांधकामांची माहिती लपवल्याचा आरोप करण्यात आला आहे.

3. ही याचिका कोणी दाखल केली?

शिवसेना आणि मनसेच्या उमेदवारांनी ही याचिका दाखल केली आहे.

4. याचिकेत काय मागणी करण्यात आली आहे?

संबंधित नगरसेवकांना अपात्र घोषित करण्याची मागणी करण्यात आली आहे.

5. हा वाद कोणत्या भागातील आहे?

हा वाद दिवा आणि ठाणे परिसरातील स्थानिक राजकारणाशी संबंधित आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com