Mangesh Kalokhe Murdered Sarkarnama
कोकण

Khopoli murder case : मंगेश काळोखेंवर सपासप वार करणारा क्रूर हत्यारा अखेर गजाआड; दिली धक्कादायक कबुली अन् घेतले दोघांचे नावं...

Contract Killer arrest in Mangesh Kalokhe murder case : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक मंगेश काळोखे यांचा सुपारी देवून खून करण्यात आल्याची माहिती रायगडच्या पोलिस अधीक्षकांनी दिली आहे.

Aslam Shanedivan

  1. खोपोलीतील माजी नगरसेवक मंगेश काळोखे यांच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपीला वानवडी पोलिसांनी अटक केली.

  2. आरोपीने दोन साथीदारांसह सुपारी घेऊन खून केल्याची कबुली दिली आहे.

  3. हडपसरमधील हांडेवाडी परिसरातून ही महत्त्वाची कारवाई करण्यात आली.

Raigad/Pune News : सनिल गाडेकर

खोपोलीमधील माजी नगरसेवक मंगेश काळोखे यांच्या खून प्रकरणातील पसार आरोपीला वानवडी पोलिसांनी अटक केली आहे. हडपसरमधील हांडेवाडी भागात ही कारवाई करण्यात आलीय. आरोपीने त्याच्याबरोबर असलेल्या दोन साथीदारांसह काळोखे यांचा सुपारी घेऊन खून केल्याची कबुली दिली आहे. या धक्कादायक माहितीनंतर आता रायगडच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

खालीद खलील कुरेशी (वय २३, रा. सय्यदनगर, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. हडपसरमधील रामटेकडी औद्योगिक वसाहतीत एका ज्येष्ठ नागरिकाला मारहाण करून त्यांच्याकडील सोनसाखळी हिसकाविण्यात आली होती.

या गुन्ह्याचा तपास सुरू असताना उमर नूर खान, साहिल हबीब फकीर यांना अटक करण्यात आली होती. दोघांची चौकशी करण्यात आली. तेव्हा खालीद कुरेशी हा खून करून पसार झाल्याची माहिती त्यांनी दिली. त्यानंतर पोलिसांनी खालीद कुरेशीचा शोध सुरू केला.

तपासात खालिद हडपसरमधील हांडेवाडी भागात येणार असल्याची माहिती वानवडी पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील पोलिस उपनिरीक्षक अल्फाज शेख, सहायक निरीक्षक उमाकांत महाडिक यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याला सापळा लावून ताब्यात घेतले.

चौकशीत खालिदने खोपोलीतील माजी नगरसेवक मंगेश काळोखे यांचा दोन मित्रांशी संगनमत करून खून केल्याची कबुली दिली. काळोखे यांचा खून करण्यासाठी त्यांना एकाने सुपारी दिल्याची माहिती दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक संगीता जाधव, सहायक निरीक्षक उमाकांत महाडिक, उपनिरीक्षक अल्फाज शेख, सर्फराज देशमुख, दया शेगर, महेश गाढवे, अतुल गायकवाड, अमोल पिलाणे आणि विठ्ठल चोरमले यांनी ही कारवाई केली.

दरम्यान आज हत्येच्या नवव्या दिवशी दिवंगत काळोखे यांच्या मुलींनाही मारण्याचा प्लॅन हल्लेखोरांचा होता असा धक्कादायक दावा त्यांच्या मुलींनी केला होता. तर काळोखे यांची हत्या सुपारी देऊनच करण्यात आल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती रायगडच्या पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांनी दिली होती. तसेच त्यांनी या हल्ल्यात संशयीत असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि प्रवक्ते भरत भगत यांचा या गुन्ह्यात अद्याप तरी सहभाग आढळून आलेला नसल्याचेही सांगितले होते.

यानंतर आता वानवडी पोलिसांनी या हत्याप्रकरणातील फरार आरोपी खालीद खलील कुरेशीच्या मुसक्या आवळल्या आहेत. यावेळी त्यानेही आपल्या कबुली जबाबात ही हत्या सुपारी घेऊन खून केल्याची माहिती दिली असून काळोखे यांचा खून करण्यासाठी त्यांना एकाने सुपारी दिल्याचे म्हटलं आहे. त्यामुळे या प्रकरणात राजकीय रंग असल्याचे समोर येत असून पोलिसांनी तपास केल्यास खरा सुत्रधार कोण हे देखील आता उघड होण्यास मदत मिळणार आहे.

FAQs :

Q1. मंगेश काळोखे हत्या प्रकरणातील आरोपी कुठे अटक झाला?
➡️ पुण्यातील हडपसर भागातील हांडेवाडी परिसरातून आरोपीला अटक करण्यात आली.

Q2. अटक केलेल्या आरोपीने काय कबुली दिली आहे?
➡️ आरोपीने सुपारी घेऊन दोन साथीदारांसह खून केल्याची कबुली दिली आहे.

Q3. आरोपीला कोणत्या पोलिसांनी अटक केली?
➡️ वानवडी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

Q4. या प्रकरणात अजून आरोपी आहेत का?
➡️ होय, आरोपीसोबत इतर दोन साथीदारांचा सहभाग असल्याची माहिती आहे.

Q5. हत्या प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आला आहे?
➡️ अटकेनंतर तपासाला वेग आला असून पुढील चौकशी सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT