Kiran Samant Sarkarnama
कोकण

Kiran Samant : धनुष्यबाण की कमळ? सामंत गाठणार दिल्ली व्हाया नागपूर; रत्नागिरी-सिंधुदुर्गसाठी चुरस

Ratnagiri - Sindhudurg Lok Sabha Constituency : लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी मी शंभर टक्के इच्छुक आहे. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून तेथे कमळ नाही तर धनुष्यबाण या चिन्हावरच निवडणूक लढवली पाहिजे.

Sunil Balasaheb Dhumal

Kokan Political News : लोकसभा निवडणूक जवळ येईल तशी महायुतीत उमेदवारीवरून मोठी चुरस निर्माण झालेली आहे. उमेदवार जाहीर झाल्यानंतरही महायुतीतील घटक पक्षांचे इच्छुक आग्रही असल्याचे दिसून येत आहे. यातूनच रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा तिढा दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे.

येथून भाजपने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना लढण्यास सांगितले आहे. मात्र शिवसेना शिंदे गटाचे नेते प्रचंज इच्छुक असलेलेल किरण सामंतांनी ही उमेदवारी रद्द करण्याची भूमिका घेतली आहे. आता त्यावर तोडगा काढण्यासाठी महायुतीती हालचाली सुरू झाल्या आहेत. किरण सामंत सध्या नागपूरला पोहचले असून तेथून ते दिल्लीला जाणार आहेत. Kiran Samant Aggressive For Lok Sabha from Ratnagiri-Sindhudurg.

किरण सामंतांनी मुंबईहून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांची भेट घेण्यासाठी नागपूरला दाखल झाले आहेत. तेथून ते फडणवीस यांच्यासोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी दिल्लीला जाणार आहेत. दिल्लीत शाह यांच्यासोबत फडणवीस आणि सामंत रत्नागिरी-सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघासाठी बोलणी करणार आहेत. दरम्यान, माघार घेतल्यानंतरही सामंतांच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत त्यांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली.

लोकसभेसाठी प्रचंड इच्छुक असलेल्या किरण सामंतांनी Kiran Samant आपल्या सोशल मीडियावर नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी माघर घेत असल्याचे सांगितले होते. मात्र ऐरवी त्यांच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडत असला तरी या पोस्टवर मात्र कुणीही रिअॅक्ट झालेले नाही. त्यावरून सामंताचा निर्णय मतदारसंघात कामाला लागलेल्या कार्यकर्त्यांच्या पचनी पडला नसल्याची चर्चा आहे. त्यानंतर सामंत फडणवीस यांच्यासोबत दिल्लीला जाऊन शाह यांच्याशी चर्चा करणार असल्याचे बोलले जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यापूर्वी सामंताही राणेंचा Narayan Rane आशीर्वादही घेतले होते. आता रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये नारायण राणेंनी आपला प्रचार सुरू केला आहे. आता सामंत नागपूरला पोहोचले असून सायंकाळी फडणवीसांसोबत दिल्लीला जाणार आहे. यावेळी सामंत म्हणाले, उदय सामंत आणि फडणीसांची काल भेट झाली होती. त्यावेळी त्यांनी चर्चा करण्यासाठी नागरपूरला बोलावले होते. लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी मी शंभर टक्के इच्छुक आहे. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून तेथे कमळ नाही तर धनुष्यबाण या चिन्हावरच निवडणूक लढवली पाहिजे. माझी तयारी पूर्ण झाली असून फक्त पेपर सोडवणे बाकी आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT