Dhananjay Munde News : शरद पवारांचा 'तो' शब्द ईश्वर पूर्ण करो; धनंजय मुंडे असं का म्हणाले?

Sharad Pawar : सलमान खान किंवा कुणाच्याही घरासमोर गोळीबार झाला तरी राज्यातील कायदा सुव्यस्था सांभाळण्यासाठी देवेंद्र फडणवीस सक्षम आहेत.
Dhananjay Munde
Dhananjay MundeSarkarnama

Maharashtra Political News : भाजपने लोकसभेत ५४३ पैकी ४०० हून अधिक जागा महायुतीला मिळवण्याचे टार्गेट ठेवले आहे. तर त्यातील ३७० जागा फक्त भाजपच्या असाव्यात असा निश्चयही केला आहे. त्यासाठी देशासह राज्यातही भाजप आणि महायुतीतील घटक पक्षांनी कंबर कसली आहे. सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवारांनी भाजपच्या चारसौ पारची खिल्ली उडवली. त्याला अजित पवार गटाचे नेते, कृषीमंत्री धनंजय मुंडेंनी उत्तर दिले आहे. Sharad Pawar Accept that BJP win more than 400 seat, Dhananjay Munde said.

'अब की बार चारसौ पार' असा नारा भाजपच्या वतीने दिला जात आहे. त्याला साथ देण्यासाठी राज्यात महायुती सरकारकडून 'मिशन 45' राबवले जात आहे. या चारसौ पारच्या मिशनवर बोलताना शरद पवारांनी Sharad Pawar, भाजपने 400 पार नाही तर 543 म्हटले पाहिजे, असं उपहासात्मक टिप्पणी केली होती. त्याबाबत परभणीत असलेल्या धनंजय मुंडेंनी पवारांनीही चारसौ पार हे मान्य केल्याचे सांगितले.

हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न असून शरद पवार आता वेगवेगळी विधाने करीत आहेत. त्याचे पडसाद आता सोशल मीडिया उमटतांना दिसत आहेत, असे म्हणत मुंडेंनी पवारांच्या 'बाहेरचे पवार आणि मूळचे पवार' अशी सुनेत्रा पवारांबाबत Sunetra Pawar केलेल्या विधानावर अप्रत्यक्षपणे टीका केली. त्यानंतर पवारांनी भाजपवर केलेल्या टीकेवर मुंडे म्हणाले, शरद पवारांनी भाजप 400 पार जाणार हे किमान मान्य तरी केले. आता त्यांचा 543 चा शब्द ईश्वर खरा करो, पूर्ण करो, असा टोलाही लगावला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Dhananjay Munde
Ambadas Danve News : अंबादास दानवे यांना बळ देत उद्धव ठाकरेंचा सूचक इशारा...

दरम्यान, अभिनेता सलमान खान Salman Khan याच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर गोळीबार झाला आहे. हा गोळीबाराची बिष्णोई गँगने स्वीकारली आहे. यावर मुंडे म्हणाले, सलामान खान यांच्या घरासमोर गोळीबार झाला आहे. मात्र कुणाच्याही घरासमोर गोळीबार होणे हे कायदा सुव्यबस्थेच्या दृष्टिकोनातून बरोबर नाही. राज्यातील कायदा सुव्यवस्था उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis सांभाळत आहेत. याचा तपशील येत नाही तोपर्यंत यावर बोलणे योग्य नाही, असे म्हणत त्यांनी गोळीबारावर जास्त बोलणे टाळले.

(Edited by Sunil Dhumal)

Dhananjay Munde
Hemant Godse News : हेमंत गोडसेंचा पत्ता का कट झाला, ठाकरे गटाच्या बडगुजरांनी सगळंच सांगितलं

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com