Kiran Samant, Narayan Rane Sarkarnama
कोकण

Kiran Samant News : कहानी मे ट्विस्ट; माघार घेऊनही किरण सामंतांनी घेतले चार उमेदवारी अर्ज

Sunil Balasaheb Dhumal

Ratnagiri Sindhudurg Political News : नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी माघार घेत असल्याचे किरण सामंतांनी दोन दिवसांपूर्वीच स्पष्ट केले होते. त्यानंतर रविवारी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपूर येथे भेट घेतली. सामंतांना विधान परिषदेचा शब्द दिल्याची चर्चा आहे. असे असतानाही सामंतांच्या पदाधिकाऱ्यांनी चक्क चार उमेदवारी अर्ज घेतले आहेत. त्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीत ट्विस्ट निर्माण झाला आहे. Kiran Samant aggressive for Ratnagiri Sindhudurg.

सामंतांनी माघार घेतल्याची पोस्ट केल्यानंतर त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सामंतांनीही Kiran Samant माझी 200 टक्के तयारी झाली असून, आता फक्त पेपर देणे बाकी असल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र, मोदींसाठी मी माघार घेत असून महायुती जो उमेदवारी देईन त्यांचे काम करणार असल्याचे सामंतांनी स्पष्ट केले होते. एकीकडे सामंत पुढील चर्चेसाठी नागपूरला गेले असता, दुसरीकडे पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यासाठी चार उमेदवारी अर्ज घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे.

यावर मात्र सामंतांच्या पदाधिकाऱ्यांनीही महायुतीच्या उमेदवारासाठीच सर्व काही सुरू असल्याचे सांगितले आहे. महायुतीचे जे कोण उमेदवार असतील त्यांचेच काम करायचे आहे, हे सत्य आहे. आम्हाला तसे आदेशही मिळालेले आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग Ratnagiti Sindhudurg मतदारसंघ खूप मोठा आहे. आता थोड्या दिवसांमध्ये प्रचार करणे जिकिरीचे होणार आहे. दरम्यान, किरण सामंत यांचे नाव जाहीर झाले, तर तयारी असावी म्हणून फॉर्म घेतले आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

रत्नागिरी-सिंधुदुर्गची उमेदवारी शिवसेनेलाच मिळावी, असा आमचा आग्रह आहे. हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून उमेदवारीवर आमचा हक्क आहे. लोकसभेसाठी आमचे सर्व स्तरावर प्लॅनिंग तयार आहे. ते नियोजन आम्ही मोदी सरकार आणण्यासाठी उपयोगात आणू. हे करताना किरण सामंत कोणत्याही प्रकारे अपक्ष उमेदवारी करणार नाहीत, असेही सांगण्यात आले.

(Edited by Sunil Dhumal)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT