Kiran Samant Sarkarnama
कोकण

Kiran Samnat News : रत्नागिरी सिंधुदुर्गमधून महायुतीकडून किरण सामंतांचे नाव फायनल ?

सरकारनामा ब्यूरो

Ratnagiri News : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे नाव चर्चेत असतानाच आता दस्तुरखुद्द नारायण नाणे यांनी किरण सामंत यांना आशीर्वाद दिल्याने पुन्हा एकदा महायुतीकडून किरण सामंत यांचे नाव चर्चेत आले आहे. शुक्रवारी रात्री उशिरा एक व्हिडिओ समोर आला असून यामध्ये किरण सामंत हे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेताना दिसत आहेत.

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीसाठी किरण सामंत फायनल होणार का ? अशी ही चर्चा यामुळे रंगली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीत किरण सामंत हे लोकसभा निवडणूक लढवणारच या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगितले जाते.

यावेळी किंगमेकरची भूमिका बाजूला ठेवून किरण सामंत हे लोकसभेसाठी मैदानात उतरले आहेत. यासाठी त्यांनी नियोजनबद्ध प्रचार ही सुरु केला आहे. 1 मार्चपर्यंत या मतदार संघाचा उमेदवार कोण हे जाहीर होईल.

भाजपकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अगोदरच आपण इच्छुक नसल्याचे सांगितले आहे. तर मंत्री रवींद्र चव्हाण पालघर, ठाण्याची जबाबदारी सोडून येथे येऊ शकत नाहीत. त्यामुळे आता पुन्हा एकदा महायुतीकडून किरण सामंत यांचा पर्याय समोर आला आहे. आता भाजपमध्ये इच्छुकाच्या यादीत माजी आमदार बाळ माने, माजी आमदार प्रमोद जठार यांची नाव आहेत पण ही दोन्ही नावे मतदारसंघात कितपत चालतील ? याबाबत साशंकता आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यामुळे शिंदे शिवसेनेकडून किरण सामंत (Kiran Samant) हे निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. दरम्यान केंद्रीय मंत्री राणे (Narayan Rane) यांची नुकतीच किरण सामंत यांनी भेट घेऊन पाया पडून आशीर्वाद घेतले आहेत. राणे कुटुंबीयांनी ही किरण सामंत यांना आशीर्वाद दिले आहेत. त्यामुळे आता किरण सामंत यांचा मार्ग मोकळा झाला आहे.

(Edited By : Sachin Waghmare)

SCROLL FOR NEXT