Devendra Fadnavis News : आंधळीतून देवेंद्र फडणवीस फुंकणार सातारा, माढाचे रणशिंग

Jaykumar Gore : जिहे-कठापूर योजनेचे जलपूजन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार होते, मात्र, त्यांचा महाराष्ट्र दौरा रद्द झाला.
Devendra Fadnavis, Jaykumar Gore
Devendra Fadnavis, Jaykumar GoreSarkarnama
Published on
Updated on

Satara Political News : स्वर्गीय लक्ष्मणराव इनामदार जिहे-कठापूर उपसा सिंचन योजनेद्वारे माण तालुक्यातील आंधळी धरणात आलेल्या पाण्याचे पूजन रविवारी (ता. २५) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते होणार आहे. दरम्यान, आमदार जयकुमार गोरेंनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आहे. या कार्यक्रमातून फडणवीस सातारा आणि माढा लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याची शक्यता आहे. आंधळीत फडणवीस नेमकं काय बोलणार याकडे आता लक्ष आहे. (Devendra Fadnavis News)

जिहे-कठापूर योजनेचे जलपूजन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) येणार होते. मात्र, काही कारणांमुळे त्यांचा महाराष्ट्र दौरा रद्द झाला. आता रविवारी सकाळी अकरा वाजता आंधळी धरणातील जलपूजन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते होणार आहे. यावेळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थित असेल.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Devendra Fadnavis, Jaykumar Gore
Manoj Jarange Latest News : अरे जरा थांब! केंद्रीय मंत्रिपदाची गर्मी दाखवू नको; जरांगे पाटलांचा रोख कुणाकडे?

आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्या पाठपुराव्यामुळे या योजनेचा पहिला टप्पा कार्यान्वित झाला आहे. यामुळे माण तालुक्यात पाणी आले आहे. देवेंद्र फडणवीसांनी माण आणि खटाव तालुक्यांना फायदेशीर ठरणाऱ्या सर्वच पाणीयोजनांना लागेल तितका निधी उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला. पाण्याचे फेरवाटप झाल्यानंतर टेंभू योजनेतूनही अडीच टीएमसी पाणी मिळून मायणी, कलेढोण तसेच कुकुडवाडसह ४२ गावांना पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. औंधसह १६ गावांच्या पाणीप्रश्नाबातही उद्या निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.

सातारा (Satara) आणि माढा लोकसभा (Madha) मतदारसंघाबाबत मोठ्या प्रमाणावर दावे, प्रतिदावे सुरू झाले आहेत. मतदारसंघ कोणत्या पक्षाला सुटणार यावर चर्चा होताना आरोप, प्रत्यारोपही केले जात आहेत. राजकीय वातावरण तापलेले असताना लोकसभेच्या या दोन्ही मतदारसंघाबाबत फडणवीस कोणते भाष्य करतात याचीही उत्कंठा वाढली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Devendra Fadnavis, Jaykumar Gore
Manoj Jarange Latest News : मनोज जरांगेंचा गर्भित इशारा; म्हणाले, 'सगेसोयऱ्यांच्या मुद्द्यावरून एक इंचही...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com