MVA Setback MLC Election; Shivsena UBT Bal Mane And BJP Nitesh Rane sarkarnama
कोकण

Uddhav Thackeray Setback : शेवटच्या दिवशी ठाकरेंना धक्का : नितेश राणेंनी गेम फिरवला; महायुतीचा उमेदवार बिनविरोध

Shivsena UBT Bal Mane Withdraws Candidature In Kokan MLC Election : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग विधानपरिषद मतदारसंघातून शेवटच्या दिवशी इंटरेस्टिंग ट्विस्ट आला असून महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने हे भाजप नेते तथा पाकलमंत्री नितेश राणे यांच्यासोबत दिसले आहेत.

Aslam Shanedivan

Kokan MLC Election News : राज्यातील विधान परिषदेच्या जाहीर झालेल्या १७ जांगासाठी निवडणुका होत असून महायुतीचे महाविकास आघाडीविरोधात पारडे जड दिसत आहे. आतापर्यंत ठाणे आणि यवतमाळ या दोन ठिकाणी माघार घेण्यात असून नाशिक आणि अहिल्यानगरमध्ये उमेदवार नसल्याने मविआची नाचक्की झाली आहे. आता तर कोकणात देखील मविआला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि मविआकडून कोकण विधान परिषद निवडणुकीत उमेदवार असलेले सुरेंद्र उर्फ बाळ माने यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. यामुळे महायुतीचे उमेदवार आणि राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार अनिकेत तटकरे यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. आता फक्त अधिकृत घोषणा होणेच बाकी असल्याचे बोलले जात आहे.

राज्यातील विधान परिषद निवडणुकांमध्ये रायगड-रत्नागिरी जिल्ह्यातील निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. येथे महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असून महायुतीने राष्ट्रवादीच्या वाट्याला सोडलेल्या या जागेवरून शिवसेना आक्रमक झाली होती. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचे पुत्र अनिकेत तटकरेंना उमेदवारी देण्यात आली आहे.

यावरून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांचे पूत्र विकास गोगावले आणि आमदार महेंद्र दळवी यांच्या मुलीने दंड थोपाटले होते. मात्र शिंदेंनी कान टोचताच गोगावलेंनी आपली तलवार मॅन केली. मात्र दळवी यांची कन्या जुईली दळवी यांनी तटकरेंच्या विरोधाक उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, सुनिल तटकरेंनी एकनाथ शिंदेंची भेट घेऊन हा विरोध देखील संपुष्टात आणला.

यानंतर कोकणात थेट लढत महायुती विरूद्ध मविआ अशी होईल असेच चित्र निर्माण झाले होते. दरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी (ता.४) महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे. भाजप नेते तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या शिष्ठाईने बाळ माने यांनी अर्ज मागे घेतल्याचे दिसत आहे. आज सकाळीच नितेश राणे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते तथा उमेदवार बाळ माने एकत्र रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले होते. यानंतर बाळ माने आपला उमेदवार मागे घेतील अशी चर्चा रंगली होती.

याबाबत आता स्वत: नितेश राणे यांनी माहिती दिली असून बाळ माने यांनी आपला अर्ज मागे घेतल्याचे म्हटलं आहे. तसेच त्यांनी अनिकेत तटकरे यांच्या विरोधाथ दाखल केलेले इतर अर्ज देखील मागे घेण्यात आल्याचे म्हटलं आहे. यामुळे आतापर्यंत अनिकेत तटकरे यांच्या समोर असणारे मोठे आव्हानच आता संपुष्ठात आल्याचे दिसत असून राष्ट्रवादीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला आहे. तर कोकणातील ही जागा देखील बिनविरोध झाल्यात जमा आहे.

दरम्यान उबाठा पक्षाचे उमेदवार सुरेंद्रनाथ यशवंत माने यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेताना म्हणाले की, निवडणुकीचा घोडेबाजार आणि आकडेवारी पाहता महाविकास आघाडीला यश मिळणे दूरचे वाटते. त्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT