Kokan MLC Election controversy; Sunil Tatkare And Eknath Shinde sarkarnama
कोकण

MLC Election : राष्ट्रवादीच्या गड राखण्याच्या स्वप्नाला शिंदेंच्या सूचनांनी सुरूंग? अनिकेत तटकरे अर्ज भरण्याच्या आधीच तटकरेंचं मोठं वक्तव्य; 'शेवटी महायुतीचे हित'

Kokan election political controversy : कोकणात विधान परिषद मतदारसंघावरून महायुतीत निर्माण झालेले संभ्रमाचे वातावरण निवळण्यास सुरूवात झाली असतानाच खासदार सुनील तटकरेंचे आता विधान चर्चेचा विषय ठरत आहे.

Aslam Shanedivan

NCP Shivsena Conflict Over Kokan MLC Seat : विधान परिषदेच्या जागांचे महायुतीत वाटप झाले असून सात जागांवर अडून बसलेल्या शिवसेनेला चार जागा सोडण्यात आल्या आहेत. तर भाजपला ११ आणि राष्ट्र्वादी काँग्रेसला दोन जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादीच्या वाट्याला कोकणाची जागा गेली असून यावरूनच आता महायुतीत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. या जागेवरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेत जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या आर्शीवादाने अनिकेत तटकरे यांचे नाव निश्चित झाले आहे. ते आज (१ जून) उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

पण याआधी शिंदे यांनी कोकणातल्या आमदार आणि नेत्यांची तातडीची बैठक घेत दिलेल्या सूचनाच ट्विस्ट निर्माण करणाऱ्या आहेत. यामुळे आज काय होणार याकडे जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागले असताना सुनील तटकरे यांनी मोठे भाष्य केलं आहे. ज्याची आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

महायुतीच्या जागावाटपात कोकण मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देण्याचे ठरले असून त्याऐवजी रायगडचे पालकमंत्री पद शिवसेनेला देण्याचे डिल झाल्याची चर्चा आहे. पण अशी कोणतीही डिल झाली नसल्याचे याआधीच शिवसेना मंत्री भरत गोगावले यांनी स्पष्ट केले आहे. तर अशा डिलवरून आमदार महेंद्र दळवी यांनी स्व पक्षाच्या नेत्यांनाच घरचा आहेर देत विधान परिषदेची ही जागा आणि पालकमंत्री पद शिवसेनेचे आहे. यामुळे असल्या डिलची गरज काय असा सवाल उपस्थित केला आहे.

तसेच कन्या कन्या जुईली दळवी-जुवेकर यांच्या बंडखोरीवर मौन बाळगत तटकरेंना आपला विरोध असेल जाहीर केले आहे. ज्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोकणातल्या आमदार आणि नेत्यांची तातडीची बैठक घेतली. या बैठकीत युतीधर्म पाळण्याची सूचना केली. मात्र ‘ज्यांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत त्यांनी ४ जूनपर्यंत ते मागे घेऊ नयेत’ अशा सूचनाही त्यांनी केल्या. यामुळेच संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून कोकण मतदारसंघाबाबत शेवटच्या दिवसापर्यंत स्पर्धा पहायला मिळणार असल्याची चर्चा आहे.

यादरम्यान खासदार सुनिल तटकरे यांचा मुलगा अनिकेत तटकरे महायुतीचे उमेदवार म्हणून आज अर्ज दाखल करणार आहेत. त्यापूर्वी सुनील तटकरे यांनी, महायुती म्हणून आम्ही १७ जागा लढत असून पक्षाच्या नेत्या सुनेत्रा पवार यांनी याबाबत निर्णय घेतला आहे. अनिकेत तटकरे यांचा उमेदवारी अर्ज आम्ही महायुतीचा उमेदवार म्हणून दाखल करत आहोत. यासाठी मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनी आर्शिवाद दिले आहेत. तसेच कोकणातील महायुतीचे नेते उदय सामंत, नितेश राणे, भरत गोगावले यांचेही पाठबळ आहे.

या जागेवरून डिल झाल्याच्या चर्चेवर बोलताना तटकरे यांनी, राजकारणात डिल वगैरे होत नाही. शेवटी राजकारणात सामुदायिक चर्चा महत्वाची असते. ती होते आणि शेवटी महायुतीचे हित समोर आहे. राजकारणात संघर्ष होत असतो. आता कोकण विधान परिषदेची जागा आमच्याकडे आली आहे. मात्र, अजूनही या जागेकरिता रस्सीखेंच बघायला मिळत आहे. आज अनिकेत तटकरे महायुतीचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणार आहेत.

तसेच अनिकेत तटकरेंची सर्व दौरे झाले आहेत. रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल याठिकाणचे प्रश्न त्याने उपस्थित राहून सातत्याने मांडले आहेत. आता मतदार संघ इतका मोठा असल्याने नियमितपणे संपर्क होईल असे नाही. त्यात काही सुधारणा असतील तर त्यात लक्ष घालण्याच्या सूचना माझ्याकडून दिल्या जातील, असेही खासदार सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT