IMD Warns of More Heavy Rain; Palghar School Holiday Announced sarkarnama
कोकण

Heavy Rain : पालघर जिल्ह्यासाठी अति मुसळधार पावसाचा 'रेड अलर्ट' जारी; पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा, अंगणवाडी आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

Palghar School Holiday Announce After IMD Warns of More Heavy Rain : हवामान विभागाने विदर्भ आणि मराठवाड्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला पालघर जिल्ह्यासाठी अति मुसळधार पावसाचा 'रेड अलर्ट' जारी केला आहे.

Aslam Shanedivan

Palghar News : गेल्या महिन्याभरापासून पाठ फिरवलेल्या मान्सूनने महाराष्ट्रात जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या २४ तासांत मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि कोकणात पावसाचा जोर वाढलेला आहे. एकीकडे मुसळधार पावसामुळे मुंबईत जनजीवन विस्कळीत झाले असून दुसरीकडे कोकणात रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अशातच IMD ने दिलेल्या अति मुसळधार पावसाच्या 'रेड अलर्ट'नंतर पालघर जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. प्रशासनाने सर्व शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर केली आहे.

हवामान विभागाने विदर्भ आणि मराठवाड्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. तर नागरिकांना घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.

हवामान विभागाने जारी केलेल्या अति मुसळधार पावसाच्या 'रेड अलर्ट' च्या पार्श्वभूमिवर पालघरच्या जिल्हाधिकारी इंदूराणी जाखड यांनी आदेश काढले आहेत. त्यांनी दक्षता म्हणून जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालय तसेच अंगणवाडी यांना सुट्टी जाहीर केली आहे.

जिल्हाधिकाऱ्या काढलेल्या या आदेशात, हवामान विभागाच्या पूर्वसूचनेत पालघर जिल्ह्याला अतिवृष्टीता रेड अलर्ट देण्यात आला आहे. सध्यस्थितीतही जिल्ह्यात अतिवृष्टी होत आहे. या पार्श्वभूमिवर जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, सरकारी व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका शाळा, अनुदानित व विनाअनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालये तसेच आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षक केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था यांना दिनांक 02.07.2026 रोजी सुट्टी जाहिर करण्यात आली आहे.

या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे, असेही या आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT