Kokan News : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे मंत्री व शिवसेना शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांची भेट घेतली आहे. केसरकर यांच्या सावंतवाडीतील निवास्थानी जाऊन भेट घेतली. एकेकाळी कट्टर राजकीय शत्रू असणारे आणि महायुतीत असतानाही केसरकर आणि राणे यांच्यात राजकीय खटके उडायचे. आता मात्र तब्बल दहा वर्षांनी राणे - केसरकर यांची निवास्थानी भेट घडली आहे. (Latest Marathi News)
लोकसभ निवडणूक २०१४ मध्ये राजकीय राणे आणि केसरकरांमध्ये राजकीय मतभेद घडून आल्यानंतर त्यांच्यात मोठा राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. दरम्यान तब्बल दहा वर्षांनी राणे यांनी केसरकरांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे. आता ते दोन्ही एकत्रित प्रचार करणार असल्याचे जाहीर केले. यामुळे आता या दोन्ही नेत्यांमध्ये दिलजमाई घडून आली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
केसरकर हे शिंदेंचे प्रवक्ते आणि महायुतीत राज्याचे मंत्री असताना राणे बंधूंना सल्ला दिला होता. "राणे बंधू हे लहान असून त्यांना समज देण्याची गरज आहे," असे केसरकर म्हणाले होते. ही टीका राणे यांच्या जिव्हारी लागली होती. याचा समाचार घेण्यासाठी एक व्हिडिओ ट्वीट करुन नीलेश राणे यांनी केसकरांना (Deepak Kesarkar) तुमची लायकी काय? असा दम दिला होता.
केसरकरांना प्रत्युत्तर देताना माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) म्हणाले, "तुम्ही शिंदेसाहेबांच्या गटाचे प्रवक्ते असू शकता, आमचे नाही. तुमची अवस्था मतदारसंघात काय केली? हे आम्हाला माहिती आहे. राणेंच्या याच दोन मुलांनी तुमची नगरपालिका घेतली. आमच्याकडे जिल्हा परिषद आहे, तुमचे पंचायत समिती सदस्य आमच्याकडे आहेत, ग्रामपंचायती आहेत. तुमची लायकी आम्हाला माहिती आहे. केसरकर कशाला उड्या मारता. तुमची मतदारसंघात काय लायकी आहे? त्यामुळे लायकीत रहायला शिका, अशा शब्दात निलेश राणेंनी हल्लाबोल केला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.