Nitesh Rane News : भाजपचा नितेश राणेंना धक्का? स्टार प्रचारकांच्या यादीतून वगळले..!

BJP politics, BJP remove Nitesh Rane name from Star campaigner : मी शिस्तीत वागणारा कार्यकर्ता, अपेक्षा ठेवून मी कधीही काम करत नाही..
Nitesh Rane
Nitesh Rane Sarkarnama
Published on
Updated on

BJP Loksabha Politics : भाजपचे युवा आमदार आणि हिंदुत्वाची भूमिका प्रखरपणे मांडणारे नितेश राणे यांना भाजपने स्टार प्रचारकांच्या यादीतून वगळले आहे. विशेष म्हणजे या यादीत मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, विधान परिषदेतील नेते प्रवीण दरेकर, गोपीचंद पडळकर यांच्या नावांचा समावेश आहे. मात्र, राणे यांचे नाव वगळल्याने भाजपचे नेते, पदाधिकारी आणि विशेषतः संघ परिवारात आश्चर्य व्यक्त होत आहे. 

नितेश राणे यांनी गेल्या दोन वर्षांत हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या संदर्भात सकल हिंदू समाजाच्या बॅनरखाली आवाज उठविला. नगर जिल्ह्यातील ख्रिश्चन धर्मांतरण, काही विशिष्ट ठिकाणी मुस्लिम धर्मीयांकडून निर्माण केली जाणारी धार्मिक तेढ अशा असंख्य प्रकरणांत नितेश राणे यांनी पुढाकार घेत ही प्रकरणे वेळोवेळी थेट विधिमंडळातील पटलावर आणली. त्यानंतर चौकशी होऊन अनेक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे निलंबन झालेले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Nitesh Rane
Lok Sabha Election : विशाल पाटलांनी लढायची हिंमत दाखवली तर वंचितचा पाठिंबा; आंबेडकरांनी पेटवली वात!

मुंबईतील (Mumbai) अनधिकृत बांगलादेशींच्या वास्तव्याकडे त्यांनी राज्याचे लक्ष वेधून घेतले. तीन मजली इमारतीसाठी परवानगी असताना चौदा मजली इमारत उभारली गेली. त्यात बांगलादेशींचे वास्तव्य होते. हा विषय समाजासमोर आणून तिथे प्रशासनाला कारवाईस भाग पाडले. तिथेही आर्किटेक्टवर गुन्हा दाखल झाला. मुंबईत गेल्या दोन महिन्यांत नितेश राणे यांच्या नेतृत्वात मानखुर्द, घाटकोपर, नागपाडा येथे तीन मोठे मोर्चे निघाले होते.  

पुण्यातील (Pune) पुण्येश्वर मंदिर परिसरातील अतिक्रमण हटविण्यात नितेश राणे हे पुढे होते. या मंदिरात राणे यांनी स्वतः जाऊन आरती केली. मालेगाव येथील काही मंदिरांचे नुकसान निधर्मी लोकांकडून केले गेले होते, हे नुकसान रोखून हा प्रश्न त्यांनी मार्गी लावला. भुईकोट किल्ला आणि मंदिरांना हक्काच्या पोलिस चौक्या त्यांनी मिळवून दिल्या. कुठल्याही वेळी कार्यकर्त्यांचे फोन उचलणारे नेते म्हणून राणे यांची भाजप परिवारात ओळख आहे. राज्यभर सकल हिंदू समाजाचे 60 हून अधिक मोर्चे नितेश राणे यांच्या नेतृत्वात काढण्यात आले, याची पावती म्हणून राणे यांचे नाव स्टार प्रचारकांच्या यादीतून वगळण्यात आले की काय? अशी भावना संघ परिवारात व्यक्त होत आहे.

Nitesh Rane
Satara Lok Sabha Election 2024 : कमळाला घड्याळाचे काटे टोचू लागले; 'या' नेत्याच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा

दरम्यान, पक्ष जो आदेश देईल, तो मानण्याचे माझे काम आहे. मी शिस्तीत वागणारा कार्यकर्ता आहे. कोणतीही अपेक्षा ठेवून मी कधीही काम करत नाही, अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी दिली. हिंदुत्व (Hindu) भक्कम करण्याचे काम आमचे आहे. यापुढील काळातही हे काम करत राहणार असल्याचे ते म्हणाले.

Nitesh Rane
Sangli Loksabha Election : 'राजीव गांधींचे पंतप्रधानपद वाचवणाऱ्या वसंतदादांचा नातू निराधार आणि...'

हिंदुत्वासाठी योगी राज्यात

भाजपचा सर्वांत महत्त्वाचा अजेंडा हिंदुत्वाचा आहे. ही भूमिका पुढे नेण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांना राज्यात पाचारण करण्यात आलेले आहे. मात्र, राज्यात गेल्या दोन वर्षांपासून हिंदूंना रस्त्यावर उतरण्यासाठी प्रेरित करणाऱ्या नितेश राणे यांना मात्र डावलण्यात आले आहे. राज्यातील लोकसभेच्या प्रचारापासून त्यांना लांब ठेवण्यात आल्याने भाजप आणि संघ परिवारातच आश्चर्य व्यक्त होत आहे.

(Edited By : Chaitanya Machale)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com