Eknath Shinde Shivsena sarkarnama
कोकण

By-election : हायव्होल्टेज लढतीत भाजप-राष्ट्रवादी-शेकापचा डाव फसला; नगरपंचायत पोटनिवडणुकीत शिवसेनेचा दणदणीत विजय

Shinde Shivsena Candidate Swapnali Jadhav Wins Pali Ward 13 By-election : पाली नगरपंचायत प्रभाग 13 च्या पोटनिवडणुकीत महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादीने शिंदेंच्या शिवसेनेवक कुरघोडी केल्याचे उघड झाले आहे.

Aslam Shanedivan

Raigad News : कोकणात विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा येथील अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि हायव्होल्टेज ठरलेल्या पोटनिवडणुकीत महायुतीतच टफ फाईट पहायाला मिळाली. तसेच याच पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीतही बिघाडी झाल्याचे समोर आले. अष्टविनायक तीर्थक्षेत्र पाली नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 13 च्या पोटनिवडणुकीत एकीकडे राज्यात सत्तेत असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि कायम विरोधात असणारा शेतकरी कामगार पक्ष एकत्र आला. तर यांच्या विरोधात एकटी शिंदेंची शिवसेना लढली. या निवडणुकीत शिवसेनेनं दणदणीत विजय मिळवला असून पक्षाच्या उमेदवार स्वप्नाली विनायक जाधव विजयी झाल्या आहेत. तर भाजप आणि राष्ट्रवादीने जाहीर पाठिंबा दिलेल्या शेकापच्या उमेदवाराला मतदारांनी नाकारले आहे.

अष्टविनायक तीर्थक्षेत्र पाली नगरपंचायतीमधील रिक्त असलेल्या प्रभाग क्रमांक १३ च्या पोटनिवडणुकीमुळे स्थानिक राजकारण कमालीचे तापले. या पोटनिवडणुकीत धक्कादायक राजकीय घडामोडी समोर आल्या असून, राज्यात एकत्र सत्तेत असलेल्या महायुतीत स्थानिक पातळीवर फूट पडली. येथे भाजप-राष्ट्रवादी पुन्हा एकदा एकत्र आली तर शिवसेना एकटी पडली. तर महाविकास आघाडीतील शेकापच्या उमेदवाराला भाजप आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळाला.

यामुळे या अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि हायव्होल्टेज ठरलेल्या पोटनिवडणुकीकडे अख्या जिल्ह्याचे लक्ष लागले होते. सोमवारी (ता. 21) पार पडलेल्या मतदानावेळी 238 मते नोंदवली गेली. ज्यात शिवसेनेच्या स्वप्नाली विनायक जाधव यांना 129 मते मिळाली.

तर भाजप-राष्ट्रवादी पुरस्कृत शेकापचे उमेदवार सुधीर अनंत साखरले यांना 105 मते. यामुळे स्वप्नाली जाधव यांनी सुधीर साखरले यांचा 24 मतांच्या फरकाने पराभव केला. धक्कादायक म्हणजे या पोटनिवडणुकीतही 'नोटा' पर्यायाला 04 मते पडली.

या विजयानंतर पाली शहरात शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. घोषणा देत गुलाल उधळत आणि ढोल-ताशांच्या गजरत विजयी मिरवणूक काढण्यात आली, तर अनेक ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT