आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोकणात राजकीय वातावरण तापले आहे.
मंत्री उदय सामंत यांनी भाजप आणि राष्ट्रवादीवर तीव्र टीका करत ‘खुमखुमी काढण्याची’ भाषा वापरली.
यानंतर आता राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने यावर प्रतिक्रिया दिली आहे.
Ratnagiri News : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकणात सध्या राजकारण तापले आहे. येथे नगरपालिका निवडणुकांच्या मुद्द्यावरून महायुतीतील वाद चव्हाट्यावर आला आहे. भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत सध्या चिपळूण नगरपालिकेच्या नगराध्यक्षावरून वाद उफाळला आहे. भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने नगराध्यक्षावर दावा केल्याने शिंदेंच्या शिवसेनेचे नेते तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी यावरून भाजप व राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत. तसेच आक्रमक शैलीत उत्तर देत खुमखुमी असेल तर आत्ताच स्वबळाबद्दल जाहीर करा मग शिवनेचा बाण कसा चालतो ते दाखवू असा धमकी वजा इशाराच दिला आहे.
उदय सामंत यांनी दिलेल्या या राजकीय धमकीनंतर आता महायुतीत गल्लीपासून मुंबईपर्यंतचे राजकारण चांगलेच ढवळले आहे. सामंत यांच्या टीकेवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी असे स्थानिक पातळीवर केलेल्या वक्तव्यांना सिरीयस घ्यायचे नसते.
स्थानिक स्तरावर आपले वर्चस्व दाखविण्याकरिता असतात असे म्हणत सामंत यांच्या इशाऱ्याची हवाच काढली आहे. तसेच पटेल यांनी, सामंत यांना स्थानिक स्तरावर आपले वर्चस्व दाखविण्याकरिता असे वक्तव्य करावे लागले आहे. यामुळे त्यांच्या या वक्तव्याला इतकं सिरीयसली घ्यायचं नसतं, असेही पटेल यांनी म्हटलं आहे.
पटेल यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीबाबत खासदार संजय राऊत यांनी केलेल्या दाव्यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी, ठाकरे बंधू आता एकत्र येतील तर त्यांना शुभेच्छा आहेत. त्यांनी महाविकास आघाडी तयार करावी, पण त्याने महायुतीला काहीही फरक पडणार नाही. विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचा सफाया झाला असून राज्यातील जनता ही समजदार आहे. कोणाची युती झाली म्हणून काही फरक पडणार नसल्याचे देखील पटेल यांनी यावेळी म्हटलं आहे.
काय म्हणाले होते सामंत?
कोकणातील नगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजत असतानाच चिपळूण येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उदय सामंत यांनी जिल्ह्यातील भाजप आणि राष्ट्रवादीवर टीका केली होती. त्यांनी भाजप व राष्ट्रवादीच्या नेत्यांना खडे बोल सुनावताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजितदादा पवार हे महायुती म्हणून निवडणुका लढवायची भाषा करत आहेत.
मात्र काही काही पिल्लावळ महायुती होऊ नये म्हणून प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आता शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपला आक्रमकपणा दाखवून द्यावा. तसेच जर भाजप आणि राष्ट्रवादीच्या कोणाला इतकी खूमखुमी असेलच तर त्यांनी आत्ताच तसे जाहीर करावे. म्हणजे शिवसेनेचा धनुष्यबाण कसा चालतो हे त्यांना दाखवू, अशा शब्दात सुनावले होते. राष्ट्रवादीचे चिपळूणचे आमदार शेखर निकम यांना टोला लगावताना, जर विधानसभेच्या निवडणुकीला शिवसैनिकांनी प्रामाणिकपणे काम केलं नसते तर येथे काय झालं असतं याची कल्पना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीलाही आहे. तसेच ती निवडून आलेल्या आमदारांना आणि सगळ्यांना देखील असल्याचे म्हटले होते.
भाजपच्या प्रशांत यादव यांनाही झापलं
दरम्यान सामंत यांनी भाजपमध्ये नुकताच प्रवेश केलेल्या प्रशांत यादव यांनाही झापलं. त्यांनी, यादव यांच्यावर निशाना साधत, काही लोकांना पंधरा दिवसांपूर्वी शिंदे साहेब चांगले होते. माझ्याबरोबर माझे मोठे बंधू किरण सामंत यांच्याबद्दलही आपुलकी होती. पण आता त्यांची चौकशी लागणार म्हणून ते दुसऱ्या पक्षात गेले. (असे मी नाही काही मंडळींनी म्हणतात) ते त्यांचे वैयक्तिक राजकारण आहे. त्याच्याशी आम्हाला काही देणे घेणे नाही. पण जर कोणी शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न करत असेल तर शिवसेना काय आहे हे ही दाखवू असे म्हणत शिवसेना पदाधिकाऱ्यांवर टीका करणाऱ्यांना आक्रमक शैलीत उत्तर दिले होते.
1. उदय सामंत यांनी कोणावर टीका केली?
उदय सामंत यांनी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका केली.
2. त्यांनी कोणती वादग्रस्त भाषा वापरली?
त्यांनी ‘खुमखुमी काढण्याची’ भाषा वापरली, जी चर्चेचा विषय ठरली.
3. प्रफुल्ल पटेल यांनी कशी प्रतिक्रिया दिली?
प्रफुल्ल पटेल म्हणाले की स्थानिक स्तरावरील अशा वक्तव्यांना सिरीयस घेऊ नये.
4. हा वाद कोणत्या पार्श्वभूमीवर घडला?
हा वाद आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झाला.
5. या घडामोडीचा कोकणातील राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो?
या वक्तव्यांमुळे कोकणातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.