
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रत्नागिरीत शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा झाला.
उद्योग मंत्री उदय सामंत यांनी भाषणात स्वबळाचा नारा देत “महायुती झाली तरी वा, नाही झाली तरी आम्ही तयार आहोत” असे ठामपणे सांगितले.
सामंत यांच्या वक्तव्याने रत्नागिरी जिल्ह्यात शिंदे गटाचा आत्मविश्वास आणि तयारी स्पष्टपणे दिसून आली.
Ratnagiri News : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरीत नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. यावेळी त्यांनी रत्नागिरीतच नव्हे, तर कोकणात भगवा फडकवा, असे म्हणत आज निवडणुकीचा नारळ फोडला. तर त्यांच्या समोरच आपल्या भाषणात शिवसेना नेते तथा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी स्वबळाचा नारा दिला. त्यांनी आगामी स्थानिकला 'जिल्ह्यात महायुती झाली तरी वा वा, नाही झाली तर आमची सर्व तयारी झाली असून सर्व ठिकाणी भगवा फडकवणार हे मात्र निश्चित, असा शब्दही सामंत यांनी दिला आहे. यामुळे तळकोकणात वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.
यावेळी गृहराज्यमंत्री योगेश कदम, माजी मंत्री दीपक केसरकर, आमदार किरण सामंत, नीलेश राणे, रवींद्र फाटक, माजी आमदार सुभाष बने, राजन साळवी, संजय कदम, राजन तेली, राजेंद्र महाडीक, सदानंद चव्हाण, जिल्हाप्रमुख राहुल पंडित, तालुकाप्रमुख बाबू म्हाप, शहरप्रमुख बिपिन बंदरकर आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच यावेळी सामंत यांनी, शिवसेनेचे आजचे व्यासपीठ अनेक अनुभवी आणि मातब्बर नेत्यांनी भरले आहे. अन्य पक्षात हे अनुभवायला कमी मिळते. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये आपले नेते एकनाथ शिंदे जो उमेदवार देतील त्याला निवडून आणण्याची जबाबदारी आपलीच आहे. आपला पक्ष हे आपले कुटुंब आहे. आपले नेते शिंदे यांनी रत्नागिरी जिल्ह्याच्या पायाभूत सुविधांसाठी 1800 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. त्यांचे हात मजबूत करण्याची जबाबदारी आता आपली आहे.
गेल्या दीड वर्षात आपले नेते उपमुख्यमंत्री शिंदे वारंवार जिल्हा दौऱ्यावर आले असून मेडिकल कॉलेजपासून आतापर्यंत जिल्ह्याच्या पायाभूत सुविधांसाठी त्यांनी 1800 कोटींचा निधी दिला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात जिल्ह्याला भरभरून देणारे ते एकमेव नेते आहेत. त्यांनी भरभरून दिले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी तिकीट देण्याचे अधिकार हे फक्त त्यांनाच असतील.
ज्याला तिकीट जाहीर होईल त्याला निवडून आणण्याची जबाबदारी आता आमची असेल. शिंदे यांच्या नेतृत्वात कोणतीही शंका मनात न ठेवता काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे स्पष्ट संकेत सामंत यांनी या वेळी दिले.
शिवसेनेचे आमदार नीलेश राणे म्हणाले, रत्नागिरीतील शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीचे कौतुक केले पाहिजे. अशी संघटना मी कधीच बघितली नाही. जिकडे बघावे तिकडे शिवसेनाच दिसते. रत्नागिरीतील 'अपेक्षेप्रमाणे' होणाऱ्या कामांचा आणि सामंत, कदम यांच्या नियोजनबद्ध कामांचे कौतुक आहे. सिंधुदुर्गातही रत्नागिरीचे उदाहरण दिले जात आहे. निवडणुका हे 'युद्ध' असून, ते आपण जिंकणार यात शंकाच नाही; परंतु गाफील राहू नका. शेवटच्या माणसापर्यंत शिवसेनेचा भगवा पोहोचला पाहिजे, असे आवाहन आमदार नीलेश राणे यांनी केले.
1. उदय सामंतांनी कोणत्या कार्यक्रमात भाषण केले?
रत्नागिरीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या शिवसेना पदाधिकारी मेळाव्यात त्यांनी भाषण केले.
2. सामंतांनी काय विधान केले?
त्यांनी “महायुती झाली तरी वा, नाही झाली तरी आम्ही स्वबळावर तयार आहोत आणि सर्व ठिकाणी भगवा फडकवणार” असे सांगितले.
3. या भाषणाचा संदर्भ काय होता?
हा मेळावा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीसाठी आयोजित करण्यात आला होता.
4. उदय सामंत कोणत्या गटाचे नेते आहेत?
ते शिवसेना (एकनाथ शिंदे गट) चे वरिष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे उद्योग मंत्री आहेत.
5. सामंतांच्या वक्तव्याचा राजकीय अर्थ काय लावला जातो?
हे वक्तव्य शिंदे गटाच्या स्वबळावर निवडणूक लढविण्याच्या तयारीचे आणि आत्मविश्वासाचे द्योतक मानले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.