Lok Sabha Election 2024  Sarkarnama
कोकण

Lok Sabha Election 2024 : ऐन लोकसभेच्या रणधुमाळीत ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखांना तडीपारीची नोटीस; कोकणातील राजकारण शिगेला...

Kokan Political News : ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या कारवाईच्या वेळेला प्रक्षोभक वक्तव्ये केल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे.

Chetan Zadpe

Kokan News : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) युवा सेना जिल्हाप्रमुखांना तडीपारीची नोटीस बजावली गेली आहे. ठाकरे गटाचे रत्नागिरी युवा सेनाप्रमुख अजिंक्य मोरे यांना ही तडीपारीची नोटीस बजावण्यात आली आहे. खेड पोलिस ठाण्यातील विविध सात गुन्ह्यांचा दाखला देत ही नोटीस त्यांना देण्यात आली आहे. ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या कारवाईच्या वेळेला प्रक्षोभक वक्तव्ये केल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे. (Latets Marathi News)

शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गटाचे नेते अजिंक्य मोरे यांना आता तडीपारीची नोटीस दिल्यानंतर या प्रकरणाची खेडच्या प्रांताधिकाऱ्यांसमोर सुनावणी होणार आहे. तर या नोटिशीवर मोरे यांना आपले म्हणणं मांडता यावे, यासाठी मुदत देण्यात आली आहे. यामुळे आता या प्रकऱणावरुन ठाकरे गटही आक्रमक होताना दिसणार, अशी शक्यता आहे.स्थानिक पातळीवर ठाकरे गटाकडून यावर पडसाद उमटत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आमदार साळवींवरील कारवाईनंतर वक्तव्यांचा ठपका -

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे (Uddhav Thackeray) आमदार राजन साळवी यांच्यावरील लाचलुचपत प्रतिबंधकच्या कारवाईनंतर युवा सेना जिल्हाप्रमुख अजिंक्य मोरे यांच्याकडून अत्यंत प्रक्षोभक वक्तव्ये केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. एसीबीच्या तपास यंत्रणेलाच त्यांनी आव्हान दिले होते. आज बाळासाहेब ठाकरे असते तर एसीबीच्या अधिकाऱ्यांचे काय केलं असतं? त्यांचं काय झालं असतं, असं वक्तव्य अजिंक्य मोरे यांनी केले होते.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT