Bharat Gogawale sarkarnama
कोकण

Bharat Gogawale : पुन्हा राजकीय भूकंप! गोगावलेंनी राष्ट्रवादीच्या नगरपंचायतीवरच भगवा फडकला, तटकरेंना होमग्राऊंडवर धक्का

Sunil Tatkare Vs Bharat Gogawale : राज्याच्या राजकारणासह रायगड जिल्ह्यातही राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मंत्री भरत गोगावले यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्याशी उघड उघड राजकीय वैर घेतले असून युती न करता स्वबळावर नारा दिला आहे.

Aslam Shanedivan

  1. रायगडमधील म्हसळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षासह नऊ नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश करून राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिला.

  2. हा परिसर सुनिल तटकरे आणि आदिती तटकरे यांचा बालेकिल्ला मानला जात असल्याने राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल झाला आहे.

  3. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उदय सामंत आणि भरत गोगावले यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला असून म्हसळ्यात शिवसेनेची ताकद वाढली आहे.

Raigad News : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील मित्रपक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदेंच्या शिवसेनेत मोठा वाद सुरू झाला आहे. अशातच भाजपने देखील ऑपरेश लोटस म्हणत शिवसेनेला धक्क्यावर धक्के देण्याची कुरघोडी केली. यामुळे नुकताच झालेल्या कॅबिनेटवर शिवसेनेनं बहिष्कार टाकत खळबळ उडवून दिली. अशातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीला रवाना झालेत.

यावरून सध्या राज्यात एकच चर्चा सुरू असतानाच त्यांचेच मंत्री भरत गोगावले यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीला जोरदार धक्का देत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यांवर कुरघोडी केली आहे. त्यांनी राष्ट्रवादीच्या ताब्यात असणारी नगरपंचायतीवर भगवा फडकवत नगराध्यक्षासह नगरसेवकांना आपल्याकडे खेचलं आहे. यामुळे जिल्ह्यात पुन्हा राष्ट्रवादी आणि शिवसेनेत वाद चिघळण्याची शक्यता आहे.

राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका लागल्या आहेत. अर्ज भरण्याची मुदत संपली असून आता छानणी केली जात आहेत. अशातच अनेक ठिकाणी माघारीही घेतली जात आहे. यानिमित्ताने सध्या सर्वच जिल्ह्यांमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापलेलं आहे. अशातच राजकीय पक्षांमध्ये पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नेत्यांना आपल्या आपल्या पक्षाच खेचलं जात आहे.

रायगडमध्येही स्थानिकच्या रणधुमाळीच्या आधीच फोडाफोडीचं राजकारण सुरू झाले असून आताही राष्ट्रवादीला भगदाड पडले आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे आणि मंत्री आदिती तटकरे यांच्या मतदार संघातच राष्ट्रवादी काँग्रेसला भगदाड पाडल्याचे समोर येत आहे. येथे त्यांचे कट्टर विरोधक असणारे शिंदेंच्या शिवसेनेचे नेते मंत्री भरत गोगावले यांनी मोठा पक्ष प्रवेश घडवून आणला आहे.

सुनिल तटकरे यांना मंत्री भरत गोगावले यांनी मोठा धक्‍का देत म्हसळा नगरपंचायतील राजकारण फिरवले आहे. नगराध्यक्षांसह नऊ नगरसेवकाचा शिवसेनेत प्रवेश घडवून आणला आहे. यामुळे राष्ट्रवादीच्या ताब्यात असणाऱ्या म्‍हसळा नगरपंचायतीवर आता भगवा फडकलाय. यावरूनच महायुतीत नाराजी नाट्य रंगले आहे.

म्हसळा नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा फरीन बशारत यांच्यासह नऊ नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री उदय सामंत आणि भरत गोगावले यांच्या उपस्थितीत मुंबई इथं शिवसेनेत प्रवेश केला आहे. म्हसळा हा राष्ट्रवादीचा आणि सुनील तटकरे यांचा बालेकिल्ला मानला जातो.

याच मतदार संघातुन पूर्वी सुनील तटकरे विधान सभेची निवडणुक लढवली होती तर आदिती तटकरे दोन टर्म निवडणुका जिंकल्या आहेत. म्हसळा नगरपंचायत शिवसेनेच्या ताब्यात आल्याने रायगडमध्ये शिवसेनेची सरशी तर राष्ट्रवादीची पिछेहाट झाल्याचे मानले जात आहे.

FAQs :

1. म्हसळा नगरपंचायतीचे किती सदस्य शिवसेनेत प्रवेशले?

एकूण 9 नगरसेवक आणि नगराध्यक्षा फरीन बशारत यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

2. हा प्रवेश कुणाच्या उपस्थितीत झाला?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत आणि मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत.

3. हा परिसर कोणत्या नेत्यांचा बालेकिल्ला मानला जातो?

सुनिल तटकरे आणि आदिती तटकरे यांचा पारंपरिक बालेकिल्ला.

4. या प्रवेशानंतर काय राजकीय परिणाम दिसत आहेत?

शिवसेनेची ताकद वाढली असून राष्ट्रवादीची पकड सैल झाली आहे.

5. या घडामोडींचा आगामी स्थानिक निवडणुकांवर काय परिणाम होऊ शकतो?

म्हसळ्यात शिवसेनेचे वर्चस्व वाढेल आणि राष्ट्रवादीची मतसंख्या कमी होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT