Bharat Gogawale : तटकरेंचा गेम चेंजर निर्णय! गोगावलेंच्या समर्थकाला फक्त फोडलचं नाही तर दिली राजपातळीवर जबाबदारी; राष्ट्रवादीला फायदाच फायदा

Sunil Tatkare’s Big Political Move : रायगड जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी याच्यातील वाद काही केल्या थांबलेला नाही. तो वाढत जाऊन विकोपाला पोहचला असून याचा फटका जिल्ह्यात महायुतीला बसताना दिसत आहे.
Shivsena Bharat Gogawale And NCP Sunil Tatkare
Shivsena Bharat Gogawale And NCP Sunil Tatkaresarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. महाड तालुक्यातील उदयोन्मुख युवा नेता सुशांत गणेश जाबरे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे.

  2. ही नियुक्ती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली असून, स्थानिक राजकारणात या निर्णयाला ‘गेम चेंजर’ मानले जात आहे.

  3. शिवसेना व मंत्री भरत गोगावले यांना या नियुक्तीमुळे राजकीय धक्का बसल्याची चर्चा रंगली आहे.

Raigad News : रायगड जिल्ह्यात महायुतीतील एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद हा विकोपाला गेला आहे. राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत येऊन वर्षभरानंतरही जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्याप न सुटल्याने दोन्ही पक्ष एकमेकांवर कुरघोड्या करताना दिसत आहेत. याचा परिणाम जिल्ह्यातील महायुतीवर झाला असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीत महायुतीचे भवितव्य काय असणार याची चर्चा सुरू झाली होती. अशातच पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मंत्री भरत गोगावले यांना डिवचले असून ज्या खंद्या समर्थकाला फोडले त्याच्यावरच राज्यपातळीवर जबाबदारी देण्यात आली आहे. यामुळे राष्ट्रवादीला फायदाच फायदा होणार असून शिवसेनेचे नुकसान झाल्याची येथे चर्चा आहे.

काहीच दिवसांच्या पूर्वी गोगावले यांचे समर्थक मानले जाणारे, महाड तालुक्यातील प्रभावशाली युवा चेहरा आणि कुणबी समाजातील उदयोन्मुख नेते सुशांत गणेश जाबरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. या प्रवेशामुळे तटकरेंनी गोगावलेंवर कुरघोडी केल्याचे बोलले जात होते.

अशातच आता जाबरे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. शिवसेनेला रामराम ठोकल्यानंतर अवघ्या काही आठवड्यांतच त्यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याने तटकरेंचा निर्णय हा गेम चेंजर ठरणारा आहे तर ही नियुक्ती पक्षाच्या धोरणात्मक हालचालींचा भाग असल्याचे बोलले जात आहे.

Shivsena Bharat Gogawale And NCP Sunil Tatkare
Bharat Gogawale : महायुतीत तणाव? गोगावलेंनी निर्णयच घेतला, राष्ट्रवादीला नाहीच म्हणत भाजपलाही युतीची शेवटची संधी

तटकरेंचा गेम चेंजर निर्णय

जाबरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काहीच आठवड्यांच्या आधी प्रवेश केला होता. या प्रवेशानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पक्षाचे अध्यक्ष अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत जाबरे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. ही घोषणाच महाडमधील राजकीय समीकरणांवर परिणाम करणारी ठरणार आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेससाठी ‘गेम चेंजर’ ठरणार असल्याचेही आता बोलले जात आहे.

गोगावलेंना धक्का

जाबरे हे महाड तालुक्यातील कुणबी समाजाचे प्रभावशाली युवा चेहरा आणि उदयोन्मुख नेते मानले जातात. तसेच ते मंत्री भरत गोगावले यांचे कट्टर समर्थकही मानले जात होते. त्यांनी गेल्या काही वर्षांत युवकांमध्ये मजबूत पकड निर्माण करत संघटन कौशल्य आणि जनसंपर्कामुळे शिवसेनेत नाव कमावले होते.

मात्र, गोगावले यांनी जाबरे यांच्याकडे दुर्लक्ष केल्यानेच त्यांनी राष्ट्रवादीचा मार्ग निवडला असावा अशी चर्चा आहे. तसेच गोगावलेंच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील या दुर्लक्षामुळे नाराजी आहे. आता हाच चेहरा राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर गेला आहे. त्याला मोठी जबाबदारी देण्यात आल्याने गोगावले यांनी दुर्लक्षित केलेल्या माणसाचा विजय झाल्याचे येथे बोलले जात आहे. तर गोगावलेंसह शिवसेनेला मोठा धक्का बसल्याचीही येथे चर्चा आहे.

राष्ट्रवादीला फायदा होणार

सुनिल तटकरे यांनी जाबरे यांच्या रूपाने कुणबी समाज आणि युवा मतदारांना खेचणारा नेता हेरला आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेससाठी महाडमध्ये मोठं नेटवर्क उभे राहण्यास मदत होणारच आहे. त्यासोबतच राज्यस्तरीय जबाबदारीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला नवा मतदारही जोडला जाणार आहे. यामुळे जाबरे यांचा प्रवेश आणि त्यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राज्य उपाध्यक्षपदी झालेली नियुक्ती ही राष्ट्रवादीला फायदाच फायदा मिळवून देणारी ठरणार आहे.

Shivsena Bharat Gogawale And NCP Sunil Tatkare
Bharat Gogawale : भरत गोगावलेंनी राष्ट्रवादीविरोधात शड्डू ठोकला? स्वबळाचा नारा देत म्हणाले, 'सत्ता कोणाच्या...'

FAQs :

1. सुशांत जाबरे कोण आहेत?
सुशांत गणेश जाबरे हे महाड तालुक्यातील कुणबी समाजातील युवा आणि प्रभावशाली नेते आहेत.

2. त्यांची कोणत्या पदावर नियुक्ती झाली आहे?
त्यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे.

3. ही नियुक्ती कोणी केली?
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ही नियुक्ती केली आहे.

4. या नियुक्तीचा राजकीय परिणाम काय होईल?
महाड आणि रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला यामुळे मोठा बळकटी मिळेल, तर शिवसेना गटासाठी ही धक्का देणारी ठरू शकते.

5. निवडणुकीच्या दृष्टीने ही नियुक्ती का महत्त्वाची आहे?
ही नियुक्ती जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झाली असून, युवक वर्ग राष्ट्रवादीकडे वळण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com