कोकण

Nitesh Rane : नितेश राणेंच्या बंगल्याबाहेर बेवारस बॅग सापडली, घातपाताचा संशय; चिठ्ठीत लिहलं...

Nitesh Rane’s Suvarnagadh residence : मुंबईतील मलबार हिल येथील ‘सुवर्णगड’ या शासकीय निवासस्थानाबाहेर संशयास्पद बॅग सापडल्याने मंत्र्यांच्या बंगल्याची सुरक्षा रामभरोसे असल्याचे उघड झाले आहे.

Aslam Shanedivan

  1. मंत्री नितेश राणे यांच्या मलबार हिल येथील शासकीय निवासस्थानाबाहेर संशयास्पद बॅग आढळली.

  2. घटनेनंतर मुंबई पोलिसांनी संपूर्ण परिसर बॅरिकेट्स लावून सील केला आहे.

  3. खबरदारीचा उपाय म्हणून वाहतूक व नागरिकांची ये-जा तात्काळ बंद करण्यात आली.

Mumbai minister residence Security News : सध्या राज्यात महानगरपालिकांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून मोठ्या प्रमाणात राज्यभर प्रचाराचा धुरळा उडताना दिसत आहे. आज प्रचाराचा सुपर संडे असून उमेदवारासह नेते पायाला भिंगरी बांधून फिरताना दिसत आहेत. याच दरम्यान मुंबईतील मंत्र्यांचे निवासस्थान असणारे मलबार हिल एका धक्कादायक घटनेनं हादरलं आहे. येथे भाजप नेते तथा राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या ‘सुवर्णगड’ या शासकीय निवासस्थानाबाहेर एक संशयास्पद बॅग सापडली आहे. ज्यानंतर येथे एकच खळबळ उडाली असून अतिमहत्त्वाच्या व्यक्तीच्या निवासस्थानाबाहेर अशा प्रकारे बेवारस वस्तू आढळल्याने मंत्र्यांच्या बंगल्याची सुरक्षा रामभरोसे असल्याचे उघड झाले आहे. तर पुन्हा एकदा मुंबईच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मागील काही दिवसापासून नितेश राणे आक्रमकपणे हिंदुत्वाची भूमिका मांडताना दिसत असून सध्या नितेश राणे भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारात व्यस्त आहेत. त्यांची आज (ता.11) छत्रपती संभाजी नगरमध्ये जाहीर सभा होणार आहे. त्याचपूर्वी त्यांच्या बंगल्याबाहेर बेवारस बॅग सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. तर हा प्रकार घातपाताचा प्रयत्न असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

नितेश राणे यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थान ‘सुवर्ण गड’ बंगल्याबाहेर बेवारस बॅग सापडल्याची बातमी वाऱ्यागत पसरल्यानंतर आता विविध तर्क वितर्क लावले जात आहेत. याबाबत माहिती अशी की, नितेश राणे यांच्या मलबार हिल येथील ‘सुवर्णगड’ या शासकीय निवासस्थानाबाहेर आज सकाळी एक बेवारस बॅग सापडली. सुरक्षा रक्षकांनाती बंगल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आढळली. बराच वेळ उलटूनही बॅग नेण्यासाठी कोणीही न आल्याने सुरक्षारक्षकांनी परिसरात शोध घेतला. मात्र कोणीच सापडले नाही.

यानंतर तात्काळ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना याची माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांसह बॉम्ब शोधक पथकाने ‘सुवर्णगड’निवासस्थानाकडे धाव घेतली. बॉम्ब शोधक पथकाने बॅगची तपासणी केली. यावेळी येथे येण्या-जाण्यास बंदी घालत रस्ता बॅरेगेट्स लावत सील करण्यात आला. तर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

बॅगेची अधित तपासणी केली असता एक चिठ्ठी सापडली. ज्यात 'बॅगमध्ये ठेवलेले बूट आणि कपडे हे तुम्ही घेऊ शकता'असे लिहिले आहे. दरम्यान, ही बॅग नेमकी कुणाची? ती येथे का सोडण्यात आली? हे करण्यामागे नेमका उद्देश काय याचा तपास पोलिस करत आहेत.

पोलिसाना या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ मिळाला असून ज्यात एक तरुण हातामध्ये ब्लॅक कलरची ट्रॉली बॅग घेऊन बंगल्याच्या आवारात फिरताना दिसत आहे. या तरुणाने ब्राऊन कलरचा टी-शर्ट, ब्लॅक कलरचे जॅकेट आणि पँट घातली आहे. याच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध देखील घेण्याचे काम पोलिस करत आहेत.

FAQs :

1. ही संशयास्पद बॅग कुठे सापडली?
मंत्री नितेश राणे यांच्या मलबार हिल येथील ‘सुवर्णगड’ शासकीय निवासस्थानाबाहेर.

2. घटनेनंतर पोलिसांनी काय कारवाई केली?
परिसर सील करून बॅरिकेट्स लावले व सुरक्षा कडक करण्यात आली.

3. नागरिकांसाठी कोणते निर्बंध लावण्यात आले?
वाहतूक व नागरिकांची ये-जा तात्पुरती थांबवण्यात आली.

4. ही बॅग कुणाची आहे हे समजले का?
सध्या ती अज्ञात व संशयास्पद असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

5. सुरक्षेच्या दृष्टीने पुढील पावले काय?
परिसर पूर्णपणे रिकामा करून तपास पूर्ण होईपर्यंत कडक सुरक्षा ठेवण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT