Paryushan school food controversy Sarkarnama
कोकण

Paryushan school food controversy : पर्यूषण काळात डब्यात मेथीची भाजी; विद्यार्थ्याला 50 रुपयांचा दंड, शाळेला नोटीस

Mira-Bhayandar civic education department seeks an explanation from Tapovan Vidyalaya after an alleged Rs 50 fine over methi in a student's lunchbox : पर्यूषण काळात खाद्यपदार्थांबाबत शाळेने घातलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्याकडून 50 रुपये घेतल्याचा आरोप; मनसेच्या तक्रारीनंतर मिरा-भाईंदर महापालिकेच्या शिक्षण विभागाची कारवाई

Pradeep Pendhare

Mira Bhayandar school controversy : पर्यूषण काळात शाळेच्या डब्यात मेथीची भाजी आणल्याने मिरा भाईंदर येथील तपोवन विद्यालयातील एका विद्यार्थ्याला 50 रुपयांचा दंड आकारण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तक्रार केल्यानंतर मिरा-भाईंदर महापालिकेच्या शिक्षण विभागाने संबंधित शाळेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

पर्यूषण काळाच्या पार्श्वभूमीवर तपोवन विद्यालयाने विद्यार्थ्यांना (Student) डब्यात मांसाहारी पदार्थांसह कांदा, लसूण, बीट आदी खाद्यपदार्थ आणण्यास बंदी घातली होती. मात्र, एका विद्यार्थ्याने डब्यात मेथीची भाजी आणली. त्यानंतर शाळेकडून संबंधित विद्यार्थ्याकडून 50 रुपये दंड घेण्यात आल्याचे समोर आले आहे. तसेच विद्यार्थ्याला कॅन्टीनमधून दुसरा खाद्यपदार्थ देण्यात आल्याची माहिती आहे.

या घटनेची माहिती समोर आल्यानंतर मनसेने (MNS) याबाबत मिरा-भाईंदर महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर शिक्षण विभागाने तपोवन विद्यालयाला कारणे दाखवा नोटीस बजावत या प्रकरणाबाबत स्पष्टीकरण मागितले आहे.

दरम्यान, पर्यूषण काळात विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा, लसूण आदी पदार्थ आणण्यास बंदी घातल्याचे आमदार नरेंद्र मेहता यांच्या सेव्हन स्क्वेअर शाळेतील प्रकरण यापूर्वी चर्चेत आले होते. त्यानंतर आता भाईंदरमधील तपोवन विद्यालयातील विद्यार्थ्याला मेथीची भाजी आणल्याबद्दल दंड केल्याचा प्रकार समोर आल्याने या मुद्द्यावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या नोटिशीनंतर तपोवन विद्यालय या प्रकरणी काय स्पष्टीकरण देते आणि विद्यार्थ्याला दंड आकारण्यामागील नेमके कारण काय होते, याकडे आता लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT