BJP Narendra Mehta Vs MNS : भाजपच्या नरेंद्र मेहतांच्या शाळेत कांदा-लसूण बंदी, क्लबमध्ये मात्र ‘चमचमीत’ पदार्थ; मनसेचा हल्लाबोल

MNS questions the school’s food restriction as the education department seeks an explanation : पर्युषणाच्या कारणावरून विद्यार्थ्यांच्या डब्यावर निर्बंध; मनसेच्या स्टिंगनंतर शिक्षण विभागाची नोटीस, संस्थेकडून खुलासा मागवला
Narendra Mehta Vs MNS
Narendra Mehta Vs MNSSarkarnama
Published on
Updated on

Mira Bhayandar Paryushan festival : मीरा-भाईंदरचे भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या ‘दुटप्पी’ कारभाराचा मनसेने पर्दाफाश केला. यावरून जोरदार चर्चा होत आहे. नरेंद्र मेहता यांच्या मालकीच्या 'सेवेन स्क्वेअर अकॅडमी' शाळेने जैन समाजाच्या 'पर्युषण' पर्वाचे कारण देत शाळकरी विद्यार्थ्यांना डब्यात कांदा, लसूण, बटाटा, बीट यांसारखी जमिनीखालील कंदमुळे आणण्यास मनाई केली.

मात्र, दुसरीकडे मेहता यांच्याच मालकीच्या आलिशान ‘सेवेन इलेव्हन क्लब’मध्ये सर्रास कांदा, बटाटा आणि लसणाचे चमचमीत पदार्थ दिले जात असल्याचा सनसनाटी प्रकार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उघडकीस आणला आहे.

शाळेत लहान मुलांच्या डब्यावर निर्बंध लादणाऱ्या भाजप (BJP) आमदार नरेंद्र मेहता यांच्या क्लबमध्ये जाऊन मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट या कंदमुळांच्या डिश मागवून त्यावर ताव मारला. मेहता यांच्या या तथाकथित ‘धार्मिक नियमांची’ पोलखोल केली.

मनसेचे (MNS) मीरा-भाईंदर विधानसभा अध्यक्ष सचिन पोकळे यांनी कार्यकर्त्यांसह थेट ‘सेवेन इलेव्हन क्लब’ गाठले. तेथे त्यांनी कांदा, बटाटा, लसूण आणि बीटपासून बनवलेल्या विविध खाद्यपदार्थांची ऑर्डर दिली आणि त्यांचा आस्वाद घेतला. स्वतःच्या व्यवसायात आणि हॉटेल्समध्ये सर्व प्रकारचे चमचमीत पदार्थ विकून नफा कमवायचा आणि शाळेत मात्र लहान मुलांवर, पालकांवर धार्मिक आचारसंहितेची सक्ती करायची, हा मेहता यांचा निव्वळ दुटप्पीपणा असल्याचा घणाघाती आरोप मनसेचे मीरा-भाईंदर विधानसभा अध्यक्ष सचिन पोकळे यांनी केला.

Narendra Mehta Vs MNS
Mira Bhayandar Meat Ban : मिरा-भाईंदरमध्ये पर्युषणावरून नवा वाद; मांसविक्री बंदी, भाजपच्या मागणीवर मराठी एकीकरण समितीचा रुद्रावतार

सोशल मीडियावर तीव्र संताप!

शाळेतील विद्यार्थ्यांच्या डब्यांवर अशा प्रकारे निर्बंध लादल्यामुळे आधीच पालकांमध्ये नाराजीचे वातावरण होते. त्यातच आता मनसेने केलेल्या या खुलाशानंतर नेटिझन्स तसेच मीरा-भाईंदरच्या नागरिकांमधून नरेंद्र मेहता यांच्यावर जोरदार टीका होत आहे. "शाळेत वेगळा न्याय आणि स्वतःच्या क्लबमध्ये वेगळा न्याय का?" असा थेट सवाल आता सर्वसामान्यांमधून विचारला जात आहे. अखेर या संपूर्ण प्रकरणामुळे मीरा-भाईंदरमधील राजकीय वातावरण तापल्यानंतर नरेंद्र मेहता यांनी कांदा, लसूण इत्यादी बंदीचा निर्णय मागे घेतला आहे.

Narendra Mehta Vs MNS
Ahilyanagar DJ Ban : डीजेवर अहिल्यानगर प्रशासनाचा दणका; पाथर्डीत स्टेटसवरून 53 जणांवर गुन्हा

मेहतांच्या शिक्षण संस्थेला नोटीस

पर्युषण पर्वाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी कांदा, लसूण, बटाटा यांसारखी कंदमुळे शाळेत आणू नयेत, अशा सूचना केल्याप्रकरणी मिरा रोड येथील सेवन इलेव्हन शिक्षण संस्थेला अखेर शिक्षण विभागाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. राज्य सरकारच्या नियमांचे उल्लंघन झाल्याच्या तक्रारीनंतर जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी तसेच मिरा-भाईंदर शिक्षण अधिकाऱ्यांकडून संस्थेला नोटीस देण्यात आली असून, या प्रकरणी खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

उत्तर काय अन् पुढच्या कारवाईकडे लक्ष...

शिक्षण विभागाने संस्थेला नोटीस बजावल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. संबंधित परिपत्रक कोणत्या आधारावर काढण्यात आले, सरकारच्या नियमांचे उल्लंघन झाले का आणि याबाबत संस्थेची नेमकी भूमिका काय आहे, याचा खुलासा शिक्षण विभागाने मागवला आहे. संस्थेच्या उत्तरानंतर शिक्षण विभागाकडून पुढील कारवाईबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com