Gautami Patil Dahi Handi : दुष्काळात लाखोंची उधळपट्टी; गौतमी पाटीलच्या नृत्यावरून अंबादास दानवे संतापले

Gautami Patil Nanded Dahi Handi event sparks political controversy amid drought concerns : मराठवाड्यात सोयाबीन-कापूस पावसाअभावी संकटात; नांदेडच्या दहीहंडीतील गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावरून ठाकरे गटाच्या अंबादास दानवेंनी सत्ताधारी आमदारांवर निशाणा साधला.
Gautami Patil Dahi Handi
Gautami Patil Dahi HandiSarkarnama
Published on
Updated on

Nanded Dahi Handi : मराठवाड्यात दुष्काळाची तीव्रता वाढली आहे. शेतकरी संकटात आहे. यातच दहीहंडी उत्सवात नांदेडमध्ये एकनाथ शिंदे शिवसेनेचे आमदार आनंद पाटील बोंढारकर यांनी नृत्यांगना गौतमी पाटील हिचा नृत्याचा कार्यक्रम आणि त्यावर लाखो रुपयांच्या उधळपट्टीवर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे आमदार अंबादास दानवे चांगलेच संतापले आहे.

दहीहंडीमध्ये महिलांना नाचवणे चूकच आहे, असे अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.

नांदेड जिल्ह्यात पावसाअभावी शेतकरी संकटात आहे. संपूर्ण मराठवाड्यात दुष्काळाची छाया गडद होत चालली आहे. असे असताना दुसरीकडे राजकीय नेत्यांकडून दहीहंडी उत्सवाच्या नावाखाली लाखो रुपयांची उधळण केली जात आहे. नांदेड दक्षिणचे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेनेचे आमदार आनंद पाटील बोंढारकर यांच्यावतीने हिंगोली गेट परिसरात भव्य दहीहंडी ‘आनंद उत्सव’ झाला. या कार्यक्रमात नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या नृत्याचे आयोजन करून पैश्यांची उधळपट्टी केल्याने संताप व्यक्त केला जातोय.

मराठवाड्यातील सोयाबीन आणि कापूस पिके पावसाअभावी वाळत असताना शेतकरी (Farmer) कोरडा दुष्काळ जाहीर करून आर्थिक मदतीची मागणी होत आहेत. त्याचवेळी मनोरंजनाच्या कार्यक्रमांवर लाखोंचा खर्च होत असल्याने शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

Gautami Patil Dahi Handi
BJP vs MNS : राज्यगीतावरून भाजप-मनसे आमनेसामने; ठाकरे बंधूंवरील टीकेला मोदींचा VIDEO दाखवत प्रत्युत्तर

यापूर्वी भाजप आमदार अमर राजूरकर यांचे पुत्र आशुतोष राजूरकर यांच्या कार्यक्रमात यूट्यूबर एल्व्हिश यादव याच्यावरही मोठा खर्च झाल्याची चर्चा आहे. आमदार अंबादास दानवे यांनी यावर दहीहंडीमध्ये महिलांना नाचवणे चूक असल्याचा टोला मारला.

Gautami Patil Dahi Handi
Shani Shingnapur forensic audit : शनिशिंगणापूर देवस्थानचे 5 वर्षांचे फॉरेन्सिक ऑडिट; गैरव्यवहाराचा शोध, 2,384 कर्मचाऱ्यांवरही प्रश्न

दरम्यान, टिकाकार आणि डीजे बंदीवर मी काहीच बोलणार नाही, असे नृत्यांगना गौतमी पाटील हिने नांदेडमधील कार्यक्रमात म्हटले. गौतमी पाटील हिच्या विरोधात भाजप नगरसेविकेने ठाणे पोलिसांकडे तक्रार केली आहे. डीजे बंदीचा निर्णय देखील कलावंताच्या विरोधात मानला जातो. मात्र याबद्दल मी नाही बोलणार नाही, असे गौतमी पाटील हिने म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com