Mira bhayandar Land Scam News : मिरा-भाईंदर परिसरातील आदिवासी जमिनींच्या खरेदी-विक्री व्यवहारात गैरव्यवहार आणि अनियमितता झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याबाबत ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी चौकशी अहवाल सरकारला दिला असून या प्रकरणात भाजपचे स्थानिक आमदार नरेंद्र मेहता आणि त्यांच्या कंपनीचे नाव समोर आले आहे. यामुळे आता बावनकुळे आपल्या पक्षाच्या आमदाराच्या विरोधात कारवाई करतात का? की कोणती वेगळी भूमिका घेतात याकडे संपूर्ण ठाणे जिल्ह्यासह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
याबाब एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार मिरा-भाईंदर परिसरातील मौजे वरसावे येथील विविध गट क्रमांकांवरील जमिनींच्या व्यवहारांत गैरव्यवहार आणि अनियमितता झाल्याची तक्रार करण्यात आली होती. तर येथील जमिनी आदिवासींकडून बिगर आदिवासी व्यक्ती आणि कंपन्यांकडे बेकायदेशीरपणे हस्तांतरित करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला होता. तर याबाबत भाजपचे स्थानिक आमदार नरेंद्र मेहता आणि त्यांच्या कंपनीवर बोट ठेवण्यात आले होते.
पण स्थानिक प्रशासनाकडून दाद मिळत नसल्याने अखेर आदिवासी कुटुंबीयांनी थेट महसूल मंत्र्यांकडे धाव घेत तक्रार दिली होती. ज्यानंतर बावनकुळे यांनी या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांना स्वतंत्र चौकशी समितीची स्थापन करून चौकशी अहवाल तयार करून सरकारकडे सुपूर्द करण्याचे आदेश दिले होते.
ज्यानंतर ठाण्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी आपला चौकशी अहवाल सरकारकडे महसूलमंत्र्यांना सादर केला आहे. ज्यात जमिनींच्या खरेदी-विक्री व्यवहारात गंभीर गैरव्यवहार आणि अनियमितता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली.
या चौकशी अहवालात सखोल कागदपत्रे तपासल्यानंतर आदिवासी जमिनींचे बेकायदा हस्तांतरण, जमीन व्यवहारातील मोठी अनियमितता आणि महसूल अभिलेखांमधील (रेकॉर्ड) गंभीर त्रुटी आढळल्याचे पांचाळ यांनी म्हटले आहे. तसेच या प्रकरणी भाजपचे स्थानिक आमदार नरेंद्र मेहता आणि त्यांच्या मालकीची असलेल्या 'सेव्हन इलेव्हन हॉटेल प्रायव्हेट लिमिटेड' कंपनीवर गंभीर ठपका ठेवण्यात आहे.
यामुळे भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता असून सरकार आणि महसूल मंत्री आपल्याच आमदाराविरोधात कारवाई कोणती करणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.