Land Scam : जमीन घोटाळा! एकनाथ शिंदेंच्या माजी नगरसेवकासह सात जणांविरोधात गुन्हा

Land Scam FIR Sunil Vayle : निधन झालेल्या व्यक्तींच्या नावे खोटे प्रतिज्ञापत्र सादर करत जमीन घोटाळा करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक, उपशहरप्रमुखा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
land scam
land scamSarkarnama
Published on
Updated on

Land Scam FIR : कल्याण पश्चिमेतील उंबर्डे गावातील जमीन व्यवहार प्रकरणात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या सेनेचे माजी नगरसेवक तथा उपशहरप्रमुख सुनील वायले यांच्यासह सात जणांविरुद्ध अॅट्रॉसिटीसह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मृत व्यक्तींच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार करून जमीन व्यवहार केल्याचा आरोप या प्रकरणात करण्यात आला आहे.

प्रमोद विश्वनाथ गायकवाड यांनी खडकपाडा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, उंबर्डे येथील वडिलोपार्जित जमिनीच्या व्यवहारात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार करण्यात आला. जयंतीलाल भोईर, रतन भोईर आणि सुमन भोईर या मृत व्यक्तींना जिवंत असल्याचे दाखवत त्यांच्या नावाने बनावट प्रतिज्ञापत्र तयार करण्यात आले. तसेच खोट्या सह्या करून खरेदीखत आणि इतर कागदपत्रे तयार करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या प्रकरणात निर्मला रविकांत वायले, अलका मनोहर वायले, सुनील राजाराम वायले, किसान नथू वायले, शिरीष दळवी, सुनील मोहनदास हिरेचंदानी आणि जिगी लालचंदानी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी अनुसूचित जाती प्रवर्गातील असल्याचे माहिती असतानाही त्यांच्यावर अन्यायकारक वागणूक देण्यात आल्याचा आरोप करण्यात आल्याने अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गतही गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

land scam
KCC New Rule : शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! RBI ने केली KCC नियमांमध्ये मोठी अपडेट; जाणून घ्या नवे नियम...

तक्रारीनुसार, ८ मार्च २०२२ ते १८ जून २०२६ या कालावधीत आरोपींनी संगनमत करून बनावट कागदपत्रांचा वापर करत जमीन व्यवहार पूर्ण केला. तसेच जमीन वाद मागे घेण्यासाठी गायकवाड कुटुंबावर दबाव आणल्याचा आणि धमक्या दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

दरम्यान, या सर्व आरोपांचे सुनील वायले यांनी खंडन केले आहे. गायकवाड कुटुंबाशी आपला कोणताही थेट संबंध नसून संबंधित जमीन व्यवहार मूळ मालक आणि विकासक यांच्यामध्ये झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. "आमची सर्व कागदपत्रे वैध आहेत. राजकीय दबाव आणि आर्थिक हेतूने मला या प्रकरणात गोवण्यात आले आहे. कायद्याचा गैरवापर होत असून न्यायालयात दाद मागणार आहे," असे वायले यांनी सांगितले. खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून संबंधित कागदपत्रे, पुरावे आणि व्यवहाराची सखोल छाननी सुरू केली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

land scam
Om Rajenimbalkar: ठाकरेंचे 'ऑपरेशन मनधरणी' ऑन; मध्यरात्री हायव्होल्टेज ड्रामा, ओमराजेंच्या भूमिकेकडे महाराष्ट्राचे लक्ष

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com