Ratnagiri News : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रतेसंदर्भातला महत्त्वपूर्ण निकाल जाहीर केला आहे. त्यांनी खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच असल्याचे निकाल दिला आहे. या निर्णयानंतर आता शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांनी प्रतिक्रिया देत उद्धव ठाकरे यांना टीकेचे लक्ष केले आहे.
शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांनी विधानसभा राहुल अध्यक्षांनी दिलेल्या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले,आता या निर्णयानंतर वल्गना सुरू होतील की लोकशाहीची पायमल्ली केली.
पण लोकशाहीवरती बोलण्यापेक्षा तुम्हाला लोकशाही अधिकाराने शिवसेनेची घटना बनवण्याचे अधिकार दिले होते. ते तुम्ही योग्यरित्या योग्य अक्कल लावून वापरले असते तर आज हे बोलण्याची वेळ आली नसती असा हल्लाबोल त्यांनी यावेळी केला आहे.
तसेच शिवसेनेची घटना देखील तुम्हाला निवडणूक आयोगाकडे रजिस्टर करता आली नाही. या एकमेव कारणामुळे तुमचा आज पराभव झाला आणि म्हणून 1999 च्या घटनेनुसार आमचा आज विजय झालेला आहे अशी प्रतिक्रिया आमदार योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी दिली आहे.
कदम म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांचा विचार फक्त शिंदेसाहेबच पुढे नेऊ शकतात. या निकालावरून हे पुन्हा स्पष्ट झालेले आहे. आज मला फक्त भावनिक बोलायचं नाही, परंतु मी या संपूर्ण केसमध्ये साक्षीदार म्हणून देखील अभ्यास करत असताना ज्या-ज्या वेळेला या गोष्टी मला समोर आल्या.
मी त्याचवेळेला उद्धवजींचं पक्षप्रमुख म्हणून काम करत असताना अज्ञान दिसून आले. स्वतःच्या पक्षाची घटना देखील जर का ते इलेक्शन कमिशनकडे रजिस्टर करू शकले नसतील तर त्यांच्या या घोडचुकीमुळे आज त्यांना हा दिवस बघायला लागतोय. आज ही वेळ त्यांच्यावर आली असल्याचेही त्यांनी सांगितले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
1999 ची जी शिवसेनेची घटना आहे, तीच घटना ग्राह्य धरली गेली आहे. आणि त्या घटनेमध्ये शिवसेनेच्या विधिमंडळाच्या सर्वाधिक आमदारांना मिळून शिवसेनेच्या विधिमंडळाच्या गटनेता निवडायचा अधिकार आहे. त्या घटनेनुसार तो अधिकार वापरून एकनाथ शिंदेंची(Eknath Shinde) आम्ही सर्व आमदारांनी पुन्हा निवडून केली होती आणि तीच नेमणूक आज योग्य ठरली असल्याचा दावाही योगेश कदम यांनी केला.
ते म्हणाले, त्या निवडणुकीच्या आघाडी आज हा निकाल लागलेला आहे आणि म्हणून मला वाटतं आज महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या आशीर्वाद आज शिंदेंना लाभले मुख्यमंत्री म्हणून त्याचं अतिशय उत्तम काम करत आहेत आता विरोधकांच्या वल्गना सुरू होतील असा टोलाही आमदार कदम यांनी लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.