Womens Protest : भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर शहरातील विधवा महिलांनी आपल्या मागण्यांसाठी शासनाविरोधात एल्गार पुकारला आहे. शासनाच्या अंत्योदय योजनेचा लाभ देण्यात यावा, घरकुल मंजूर झालेल्या विधवा महिला लाभार्थ्यांना सरसकट पट्टे वाटप करण्यात यावे, या प्रमुख मागण्यांसाठी त्यांनी आंदोलन केले.
जिल्ह्यात प्रथमच अशा पद्धतीचे आंदोलन करण्यात आले. शेकडो महिला लाखांदूर नगर पंचायतचे गटनेते तथा नगरसेवक बबलू नागमोती यांच्या नेतृत्वात लाखांदूर तहसीलवर धडकल्या. महिलांच्या या आंदोनामुळे भंडाऱ्यातील राजकीय व प्रशासकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
लाखांदूर शहरातील विधवा महिलांकडे उपजीविकेचे कोणतेही दुसरे माध्यम नाही. त्यांना कुणाचाही आधार नाही. परिणामी त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. उपक्षेतितेचे जीवन त्यांच्या नशिबी आले आहे. त्यामुळे विधवा महिलांना शासनाच्या अंत्योदय योजनेचा लाभ देत त्याअंतर्गत अन्न-धान्य देण्यात यावे. शहरातील नागरिक गत अनेक वर्षांपासून लाखांदूर प्लॉट भागात राहातात. या भागाला ‘आबादी व जंगल झुडपी क्षेत्र’ असा दर्जा आहेत. त्यामुळे लाखांदूर शहरात शासनाच्या विविध योजनेअंतर्गत राबविल्या जाणाऱ्या घरकूल योजनेचा लाभ लाभार्थ्यांना मिळू शकत नाही.
शासनाच्या या नोंदीमुळै शहरातील प्रभाग क्रमांक 1 ते 10 मधील नागरिक घरकुल योजनेपासून वंचित आहेत. शहरातील काही नागरिकांना व विधवांना घरकुल मंजूर झाले आहे. असे असताना आखीव पत्रिका व पट्टे नसल्याने त्यांना योजनेचा लाभ मिळू शकत नाही. हक्काच्या मागण्यांसंदर्भात गेल्या अनेक महिन्यांपासून शहरातील नागरिक आंदोलन करीत आहेत. त्यांच्या मागण्यांसाठी लाखांदूर नगर पंचायतचे गटनेते तथा नगरसेवक बबलू नागमोती यांनी पुढाकार घेतला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
या आंदोलनाचा एक भाग म्हणून शेकडो लाभार्थी लाखांदूर तहसीलवर धडकले. लाखांदूर येथील प्रभाग क्रमांक 1 ते 10 तथा संपूर्ण शहरातील लाभार्थ्यांना तत्काळ आखीव पत्रिका व पट्टे देण्यात यावे. विधवा महिलांना शासनाच्या अंत्योदय योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी लाखांदूर तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली.
भंडारा जिल्ह्यात असे अनेक नागरिक आहेत, जे अद्यापही अनेक योजनांच्या लाभांपासून वंचित आहेत. शासन आपल्या दारी या कार्यक्रमातून मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यानी भंडारा शहराला भेट दिली. या कार्यक्रमात अनेक लाभार्थ्यांना योजनेच्या प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. प्रमाणपत्रांची ही संख्या लोकसंख्येतील लाभार्थ्यांच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळेच लाभार्थ्यांना आपला हक्कासाठी आंदोलनाचा मार्ग निवडावा लागत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.